शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी होणार वायफाय राजनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:16 IST

जिल्हा नियोजन व विकास समिती गडचिरोली च्या नाविन्यपूर्ण योजनेतून अहेरी नगरपंचायतीला वायफायची सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती हाती आली आहे.

ठळक मुद्देतीन वर्षे मिळणार लाभ : दीड कोटी रूपयांतून मोफत इंटरनेट सेवा

विवेक बेझलवार।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जिल्हा नियोजन व विकास समिती गडचिरोली च्या नाविन्यपूर्ण योजनेतून अहेरी नगरपंचायतीला वायफायची सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे अहेरी राजनगरी ही वायफाय नगरी होणार असून यांचा लाभ शासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेला होणार आहे. सदर योजना कार्यान्वित होणार असल्याने अहेरी राजनगरी ही वायफाय नगरी होणार आहे.अहेरी नगरी डिजिटल होण्याच्या मार्गावर असून या भागात पाहिजे त्या प्रमाणात इंटरनेट ची सेवा गतिमान नाही. तसेच ही सेवा महागडी असल्याने सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखे नाही. मात्र नगर पंचायतीच्या माध्यमातून शहरात वायफायची सुविधा निर्माण झाल्यास नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रमुख शासकीय कार्यालये, तसेच विद्यार्थी व नागरिकांना व्हिडिओ कॉन्फरन्स, टेलिमेडीसीन व जलद इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तत्काळ करणे शक्य होईल. अहेरी शहरात तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आदीसह विविध कार्यालये आहेत. बाहेर गावावरून येणाºया लोकांना वायफाय सुविधा निर्माण झाल्यानंतर आपली कामे गतिने आटोपता येणार आहे.नगरातील विविध कार्यालयातील समन्वय साधण्यासाठी एकाच वेळेस व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करणे शक्य होईल. जलद इंटरनेटमुळे सीएससी, महाआॅनलाइन आपले सरकार पोर्टलचे कामे सुद्धा गतीने होईल.सदर वायफाय योजना जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या प्रयत्नाने अहेरी नगर पंचायतीमध्ये मंजूर झाली आहे. अहेरी शहर डिजिटल होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. वायफाय सुविधेचा उपयोग विद्यार्थी, अधिकारी तसेच जनतेला होणार असून शासकीय कामांना वेग मिळणार आहे.- हर्षा ठाकरे , नगराध्यक्ष, नगरपंचायत, अहेरी