शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी न.पं.ला मिळणार बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:19 IST

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छता मोहीमेंतर्गत प्रत्येक नगरपंचायत हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने मोहीम राबवली होती. या अनुषंगाने करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय तपासणीत अहेरी नगरपंचायत पात्र झाली असून ती जिल्ह्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली.

ठळक मुद्देकेंद्र स्तरावरील स्वच्छ संरक्षणात अव्वल : जिल्ह्यातील एकमेव नगर पंचायत ठरली पात्र

विवेक बेझलवार।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छता मोहीमेंतर्गत प्रत्येक नगरपंचायत हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने मोहीम राबवली होती. या अनुषंगाने करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय तपासणीत अहेरी नगरपंचायत पात्र झाली असून ती जिल्ह्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली. स्वच्छ सर्वेक्षणातून अहेरी नगर पंचायतीला आता जवळपास एक कोटी रूपयांचे बक्षीस केंद्र शासनाकडून मिळणार आहे.केंद्र शासनाने शहरी भागात वैयक्तिक शौचालय उभारणी व गावे हागणदारी मुक्तीची चळवळ गेल्या दोन वर्षांपासून सुरू केली आहे. त्या अनुषंगाने कामाची पाहणी अनुक्रमे जिल्हा, राज्य व केंद्र या तिनही स्तरावरून करण्यात आली. यात अहेरी नगरपंचायत तसेच इतर नगरपंचायत सुद्धा जिल्हा व राज्य स्तरावर पात्र झाल्या. मात्र केंद्रस्तरीय पथकाने केलेल्या निरीक्षणात अहेरी ही एकमेव नगरपंचायत पात्र झाली आहे. यापूर्वी केंद्रीय पथकाने आरमोरी नगर पंचायत व वडसा नगर पालिकेचे निरीक्षण केले आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या क्वालिटी कॉन्सिल आॅफ इंडियाची (क्यूसीआय) ची नेमणूक करण्यात आली. केंद्र स्तरावरून आलेल्या क्यूसीआयच्या चमूने डिसेंबर २९ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान चार दिवस अहेरी शहराचे सर्वेक्षण केले. वैैयक्तिक शौचालय व हागणदारी मुक्तीच्या मुद्यावर पाहणी करून प्रत्यक्षात माहिती घेतली.क्यूसीआयच्या चमूने प्रत्यक्ष दौरा करून शहरात तपासणी करीत अहेरी येथील लोकांचे, विद्यार्थ्यांचे, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यामध्ये अहेरी येथील जिल्हा परिषद शाळा, श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालय तसेच विविध प्रभागातील शौचालय ठिकाणी जाऊन पाहणी केली. व्यापारी क्षेत्रात प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्वछता व आरोग्य विषयक चर्चा केली. तेथील शौचालय व इतर जागांची प्रत्यक्षात तपासणी करून व माहिती जाणून घेतली.अहेरी शहरासाठी ही गोड बातमी असून केंद्रीय पथकाद्वारे अहेरी नगरपंचायतीला केंद्रीय स्तरावर ओडीएफ दर्जा मिळाला. जिल्यातील पहिली नगर पंचायत आहे. न. पं. ला कर्मचाऱ्यांची ६४ पदे मंजूर असताना ६ नियमित व ३ रोजंदारी पद्धतीने कार्य करतात. अशा स्थितीत आमच्या कर्मचऱ्यांनी गुड मॉर्निंग पथक व इतर कामे चांगल्या पद्धतीने केल्याने हा मान आम्हाला मिळाला तसेच सर्व नगसेवकांच्या सहकार्याने हे शक्य झाले.- डॉ. कुलभूषण रामटेके, मुख्यधिकारी नगरपंचायत, अहेरी