शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत कोया पुनेम पेरसापेन उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:23 IST

आदिवासी समाज संघटित असला तर या समाजाचा विकास कोणीच रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. अहेरी येथील धरमपूर वॉर्डात कोया पुनेम जय पेरसापेन, सल्ला गांगरा शक्ती व आदिवासी समाजाच्या सप्तरंगी झेंडाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देधर्मरावबाबांचे प्रतिपादन : संघटित आदिवासींचा विकास कुणीही रोखू शकणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासी समाज संघटित असला तर या समाजाचा विकास कोणीच रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. अहेरी येथील धरमपूर वॉर्डात कोया पुनेम जय पेरसापेन, सल्ला गांगरा शक्ती व आदिवासी समाजाच्या सप्तरंगी झेंडाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच गंगाराम कोडापे होते. याप्रसंगी जि. प. च्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, सांबय्या करपेत, जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, सरपंच बालाजी गावडे, नगरसेवक शैलेश पटवर्धन, एम. बी. कुसनाके, मारोती आत्राम, लक्ष्मीबाई कुळमेथे, पुनेम प्रचारक शंकर आत्राम, प्रदीप सडमेक, बुधाजी सिडाम उपस्थित होते.पुढे बोलतांना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, आदिवासी समाज हा मूळनिवासी असून जल, जंगल, जमीनचे संवर्धन करूनही समाजाची आज दयनीय अवस्था आहे. पुढच्या पिढीकरिता ही धोक्याची घंटा आहे. अहेरी येथे क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचा पुतळा उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. समाजासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांकडून प्रेरणा घेऊन त्या दिशेने प्रत्येकांनी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी आदिवासी समाजाचा एक फार मोठा इतिहास असून पूर्वजांची प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करावे व युवक आणि युवतींनी उच्च शिक्षण घेऊन स्वत:सह समाजाची प्रगती साधावी, असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला आदिवासी परंपरा व संस्कृतीनुसार ढोल ताशांच्या निनादात रॅली काढण्यात आली. त्यानंतर कोया पुनेम पेरसापेन, सल्ला गांगरा शक्तीचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आला. तसेच सामूहिक पूजन करण्यात आले.कोया पुनेम पेरसापेन, सल्ला गांगरा शक्ती व आदिवासी समाजाच्या सप्तरंगी झेंड्यासाठी जागा दान केल्याबद्दल धरमपूर वॉर्डातील राजू कुसराम यांचा समाजाच्या वतीने धर्मरावबाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक सत्यनारायण कोडापे, संचालन महेश मडावी तर आभार रुपेश गावडे यांनी मानले. यावेळी आदिवासीबांधव उपस्थित होते.