शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीला मिळाली सुसज्ज बाजारवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:15 IST

शहरवासीयांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे अहेरी शहरात सर्व सोयीयुक्त बाजारवाडी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री आत्राम यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत नगरोत्थान विकास योजनेतून अहेरी नगर पंचायतला १ कोटी ५० लक्ष रुपये सुसज्ज बाजारवाडीच्या बांधकामासाठी मंजूर केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : दीड कोटी रूपयांचा निधी विकासकामांवर खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शहरवासीयांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे अहेरी शहरात सर्व सोयीयुक्त बाजारवाडी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री आत्राम यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत नगरोत्थान विकास योजनेतून अहेरी नगर पंचायतला १ कोटी ५० लक्ष रुपये सुसज्ज बाजारवाडीच्या बांधकामासाठी मंजूर केले. या निधीतून अहेरी शहरातील बाजारवाडी मधील विविध विकासकामे पूर्ण झाले. त्या विकासकामांचे नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.१.५ कोटी रुपयांच्या निधीतून अहेरी शहरातील बाजारवाडीचे रूप पालटले असून बाजारवाडीत भाजीपाला व इतर विक्रेत्यांसाठी सुसज्ज ओटे बांधण्यात आले आहेत. तसेच बाजारवाडीत अंतर्गत सिमेंट रस्ते व नालीचेही बांधकाम करण्यात आले आहे. सर्व विक्रेत्यांना लाईटची व इतर सर्व प्रकारच्या सोयी याठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या वस्तू विक्रेत्यांना व लोकांसाठी सोय होणार आहे.लोकार्पण कार्यक्रमाला जि. प. समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, उपाध्यक्ष कमल पडगेलवार, उपविभागीय अभियंता (बांधकाम) मेश्राम, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी शहराध्यक्ष मुकेश नामेवार, नगर पंचायत सभापती नारायण सिडाम, सुवर्णा येमुलवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, पप्पू मद्दीवार, शंकर मगडीवार, सरफराज आलम, सचिन पेद्दापल्लीवार, गुड्डू ठाकरे, दिलीप पडगेलवार, संतोष येमुलवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.११ वॉर्डांमध्ये लागले हायमास्टअहेरी शहरातील अनेक प्रभागात अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे त्याठिकाणी हायमास्ट लाईट लावण्याची लोकांची मागणी होती. याची दखल घेत अहेरी नगर पंचायततर्फे महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या नवीन नगरपंचायत सहाय्य योजनेतून ३० लक्ष रुपये खर्च करून शहरातील विविध प्रभागात ११ हायमास्ट लाईट लावण्यात आले होते. त्याचेही लोकार्पण पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यामुळे शहरातील अंधाराचे साम्राज्य संपुष्टात येणार असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.