शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीच्या टीएचओवर अदखलपात्र गुन्हा दाखल

By admin | Updated: June 2, 2016 02:51 IST

अहेरी तालुक्यातील कमलापूर आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका मंजुळा मंसाराम सडमाके यांनी अहेरीचे ...

गैरवर्तणूक प्रकरण : आरोग्य सेविकेची तक्रारकमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका मंजुळा मंसाराम सडमाके यांनी अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे यांच्या विरूद्ध १८ मे रोजी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी डॉ. शिवराम कुमरे यांच्या विरोधात कलम ५०४ व ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्त्या आरोग्यसेविका सडमाके यांच्या लेखी तक्रारीवरून सदर प्रकरण अदखलपात्र असल्याने सदर तक्रारकर्त्या आरोग्यसेविकेने न्यायालयात दाद मागावी, अशी समज पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोग्य सेविकेने म्हटले होते की, २००३ पासून आपण आरोग्य सेविका पदावर कार्यरत आहो. १४ आॅगस्ट २००५ पासून मांडरा रुग्णालयात कार्यरत आहे. तालुका आरोग्य अधिकारी कारण नसताना जिथे जिथे भेटतात तेथे तेथे मी तुला नोकरी करू देणार नाही, तसेच तु नोकरी कशी करते, मी पाहुण घेईल, अशी धमकी देत असतात. आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिनस्त कर्मचारी असल्याने आपण आजपर्यंत वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली नाही. १६ मे रोजी अहेरी पंचायत समितीतील सर्व आरोग्य केंद्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सभा घेण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे, डॉ. पांढरे तसेच महागाव व जिलमगट्टाचे डॉक्टर उपस्थित होते. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी अर्भक मृत्यूबाबत आपल्याला उलटसुलट प्रश्न विचारून १२.३० वाजतापासून ५ वाजेपर्यंत उभे ठेवले. पाणी पिण्याची व औषध घेण्याची परवानगी मागितली असता, शिविगाळ केली, असेही तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)