शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी, आलापल्लीला वादळाचा जोरदार तडाखा

By admin | Updated: May 19, 2016 01:10 IST

अहेरी, आलापल्ली : अहेरी, आलापल्ली परिसराला बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक जोरदार वादळासह पावसाला सुरूवात झाली.

घरांवरील टिनपत्रे व कवेलु उडाले : वन वसाहतीतील घरांचे सर्वाधिक नुकसान अहेरी, आलापल्ली : अहेरी, आलापल्ली परिसराला बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक जोरदार वादळासह पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे आलापल्ली येथील वन वसाहतीतील ३० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे.दिवसभर कडाक्याचे ऊन पडलेली असताना अचानक सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळाला सुरूवात झाली. याचा सर्वात मोठा फटका आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या वन वसाहतीमधील कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांना बसला. निवासस्थानावरील टिनपत्रे उडून गेल्याने त्यांच्या घरातील अन्न, धान्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व इतर सर्व साहित्य पावसाने भिजले. टिनपत्रे उडाल्याने कुटुंबातील सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. सिरोंचा वन विभागाच्या वर्कशॉपसमोर मोठे वृक्ष कोलमडून पडले. तेथे ११ कर्मचारी राहत होते. सर्वच कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. राजू इल्लुरकर या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. बँक आॅफ महाराष्ट्र शाखा आलापल्लीसमोर वृक्ष कोलमडल्याने मुख्य प्रवेशद्वार बंद झाले. तसेच बसस्थानक परिसरातील एका झाडाची फांदी मुख्य लाईनवर पडली. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयाच्या अगदी प्रवेशद्वारासमोर मुख्य मार्गावरच मोठे वृक्ष कोलमडून पडल्याने काही वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने वादळाच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाला. अचानक आलेल्या वादळामुळे आलापल्लीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागेपल्ली शहरालाही वादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)कवेलू काढून टिनपत्रे टाकलेवन वसाहतीमधील शासकीय निवासस्थानांवर यापूर्वी कवेलु टाकण्यात आले होते. वादळ झाल्यास कवेलुच्या घराचे फार मोठे नुकसान होत नाही. मात्र ज्या शासकीय निवासस्थानांची डागडुजी करण्यात येत आहे, त्या निवासस्थानावरील कवेलु काढून टिनपत्रे लावली जात आहेत. टिनपत्रे लावण्यासाठी अकुशल कामगारांचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे टिनपत्रेही व्यवस्थित लावली जात नाही. त्याचबरोबर कवेलुच्या तुलनेत टिनपत्रे उडून जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. शासकीय निवासस्थानांच्या डागडुजीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. हे या वादळामुळे झालेल्या नुकसानीतून सिध्द झाले आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यास लाखोंचा गैरव्यवहार समोर येणार असल्याची प्रतिक्रिया वन कर्मचाऱ्यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे. अहेरी पोलीस स्टेशनसमोर झाड कोसळलेअहेरी येथे सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास वादळाला सुरूवात झाली. या वादळात अहेरी पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेले झाड कोसळले. पावसापासून बचाव करण्याकरिता दोन पोलीस कर्मचारी झाडाखाली थांबले होते. तेच झाड कोसळले. प्रभाग क्रमांक १२ मधील सतीश तोडेटी यांच्या घरावरील छत पूर्णत: उडून गेले. पॉवर हाऊस मार्गावरील राजगाटासमोर व अहेरी उपजिल्हा रूग्णालयासमोरसुध्दा अनेक झाडे कोसळली. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने अहेरीचा वीज पुरवठा खंडीत झाला.पेरमिलीतही वादळामुळे नुकसानअहेरी तालुक्यातीलच पेरमिली परिसरात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वादळ व पाऊस सुरू झाला. वादळामुळे जंगलातील झाडे कोसळून पडली. अनेक घरांमधील कवेलु, टिनपत्रे उडून गेली. सहा महिन्याची चिमुकली झोपडीत झोपली असताना झोपडीवर झाड कोसळले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पावसानंतर पेरमिली परिसरातील ग्रामीण भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला.