शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन व कृषी क्र ांती योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:28 IST

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्र ांती योजना आणली आहे.

ठळक मुद्देविहिरीसाठी अडीच लाख मिळणार : विद्युत जोडणी, सौरपंप, ठिबक सिंचनासाठीही निधी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्र ांती योजना आणली आहे. या योजनेत जुन्या व नवीन विहीरींसह अनेक प्रकारच्या सुविधांसाठी निधी दिला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती नवबौध्द व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा सातबारा व आठ-अ असणे आवश्यक असून वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांच्या वर नसावे. संबंधित शेतकऱ्याला सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ आॅगस्टपासून आॅनलाईन अर्ज घेण्यास सुरूवात झाली आहे. ४ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्जाची प्रत कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडेही सादर करावयाची आहे. १०० टक्के अनुदानावर असलेल्या या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि सभापती नाना नाकाडे व कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप यांनी केले आहे.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गतही नवीन विहिरीच्या अनुदानासाठी आदिवासी शेतकऱ्यांकडे ०.४० ते ६ हेक्टर शेतजमीन असावी. इतर बाबींच्या लाभासाठी ०.२० हेक्टरपर्यंत शेतजमीन असावी, अशी अट आहे.असा मिळणार लाभया योजनेअंतर्गत नवीन विहिरीकरिता शेतकऱ्यांना अडीच लाख रु पये तर जुन्या विहीर दुरु स्तीकरीता ५० हजार रु पये, विद्युत जोडणीकरीता १० हजार रु पये, सौर कृषीपंप संचासाठी २० हजार रु पये, सुक्ष्म सिंचनास चालना देण्यासाठी ठिंबक सिंचन संचाकरिता ५० हजार रुपये, तुषार संचासाठी २५ हजार रु पये, तसेच शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाagricultureशेती