शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या रात्री सुरू करावा लागताे कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 05:00 IST

दिवसेंदिवस कृषिपंपांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात वीज निर्मिती हाेते. कृषिपंपांना अविरत वीज पुरवठा करायचे म्हटल्यास घरगुती, उद्याेग व वाणिज्य कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राहकांना भारनियमन करावे लागणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कृषिपंपांसाठी स्वतंत्र फिडर आहे, अशा विद्युत लाईनवर सुमारे १४ ते १६ तासांचे भारनियमन केले जाते. शासनाने कृषिपंपांसाठी भारनियमनाचा वेळापत्रकही ठरवून दिला आहे. 

ठळक मुद्देकृषी विद्युत लाईनवर १६ तासांचे भारनियमन : कुरखेडा तालुक्यातील पिके धाेक्यात

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : कृषिपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने शेड्यूल्ड ठरवून दिले आहे. त्यानुसार दुसऱ्या व चवथ्या आठवड्यात रात्री १२ वाजतापासून सकाळी १० वाजेपर्यंतच वीज पुरवठा केला जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ध्या रात्री शेतावर जाऊन वीज पुरवठा सुरू करावा लागते. हे काम जीवावर बेतणारे आहे. मात्र पाेटासाठी जीवावर उदार हाेऊन रात्री शेत गाठावे लागते.  खरीप पिके निघल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी रबी हंगामात भाजीपाला, कडधान्य, उन्हाळी धानपीक व मका पिकाची लागवड करतात. यातील उन्हाळी धानपिकाला माेठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. डिझेल इंजिन परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंप खरेदी केलेे आहेत.दिवसेंदिवस कृषिपंपांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात वीज निर्मिती हाेते. कृषिपंपांना अविरत वीज पुरवठा करायचे म्हटल्यास घरगुती, उद्याेग व वाणिज्य कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राहकांना भारनियमन करावे लागणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कृषिपंपांसाठी स्वतंत्र फिडर आहे, अशा विद्युत लाईनवर सुमारे १४ ते १६ तासांचे भारनियमन केले जाते. शासनाने कृषिपंपांसाठी भारनियमनाचा वेळापत्रकही ठरवून दिला आहे. पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा राहते. तर दुसऱ्या व चवथ्या आठवड्यात रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत वीज पुरवठा राहते. रात्री १२ वाजता विद्युत पुरवठा सुरू हाेत असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेत गाठून पम्प सुरू करावे लागते. अनेक शेतकऱ्यांचे शेत जंगलाला लागून आहेत. रात्री जंगलाकडे जाताना किंवा घराकडे परत येताना जंगली जनावरांचा हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवसा वीज पुरवठा सुरू असणे गरजेचे आहे. 

रात्री १२ वाजता कृषिपंप सुरू करण्यासाठी शेतावर जावे लागते. हे काम धाेक्याचे आहे. मात्र शेतीवरच आपले पाेट असल्याने जीव धाेक्यात घालून जावे लागते. कृषिपंपांना सुद्धा उद्याेगाप्रमाणेच नियमित वीज पुरवठा करावा.  - किशाेर दर्राे, शेतकरी

पाऊस चांगला झाल्याने मुबलक पाणी

यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडला. तसेच शेवटपर्यंत पाऊस पडल्याने नदी, नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे. यातून उन्हाळी व रबी पिके घेणे शक्य आहे. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी रबी पिकांच्या मशागतीला सुरूवात केली आहे. काही ठिकाणी पेरणी आटाेपली आहे.

कुरखेडा तालुक्यात प्रामुख्याने उन्हाळी धानपीक व मका पिकाची लागवड केली जाते. मका पिकाच्या तुलनेत धानपिकाला अधिक प्रमाणात पाणी लागत असल्याने शेतकरी आता मका पिकाकडे वळला आहे. दरवर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसते. 

कुरखेडा तालुक्यात स्वतंत्र विद्युत लाईनकुरखेडा तालुक्यातील गेवर्धा, चिखली, गुरनाेली या फिडरवरून वीज पुरवठा हाेणाऱ्या कृषी पंपांसाठी स्वतंत्र विद्युत लाईन टाकण्यात आली आहे. या तीन फिडरअंतर्गत खेडेगाव, आंधळी, नवरगाव, बेलगाव, अंजनटाेला, अरतताेंडी, देऊळगाव, खरमतटाेला, शिरपूर या गावांचा समावेश आहे. या भागामध्ये जवळपास १ हजार ३०० कृषिपंप आहेत. स्वतंत्र लाईन असल्याने या ठिकाणी भारनियमन केले जाते. मात्र स्वतंत्र लाईन नसलेल्या ठिकाणी मात्र रात्रंदिवस वीज पुरवठा सुरू राहते, हे विशेष. 

भारनियमनाचे वेळापत्रक शासन व महावितरणच्या मध्यवर्ती कार्यालयाने ठरवून दिले आहे. त्याप्रमाणे गेवर्धा, गुरनाेली व चिखली फिडरवर भारनियमन केले जात आहे. भारनियमन बंद करण्याची कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी असली तरी शासनाचे निर्देश आपण टाळू शकत नाही.   - मिथीन मुरकुटे, उपविभागीय अभियंता, कुरखेडा

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज