शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रचालकांचा जिल्हाभर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:47 IST

गडचिरोली डिस्ट्रिक्ट अ‍ॅग्रो डिलर असोसिएशनच्या वतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाभरातील कृषी केंद्र बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता.

ठळक मुद्देशासनाला निवेदन : डिस्ट्रिक्ट अ‍ॅग्रो डिलर असोसिएशनमार्फत आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली डिस्ट्रिक्ट अ‍ॅग्रो डिलर असोसिएशनच्या वतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाभरातील कृषी केंद्र बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. गुरूवारी जिल्हाभरात कृषी केंद्र बंद ठेवून विविध मागण्यांचे निवेदन तालुका स्तरावर तहसीलदारांमार्फत शासनाला पाठविण्यात आले.कुरखेडा येथील तहसीलदार अजय चरडे असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशके फवारणी केल्यामुळे विषबाधा होऊन शेतकºयांचा मृत्यू झाला. यासाठी कृषी केंद्र चालकाच जबाबदार असल्याचा प्रचार केला जात आहे. कृषी केंद्र चालकांवर पोलीस कारवाई, विक्री परवाना रद्द करणे, विक्रीबंद आदेश देणे अशा प्रकारची गंभीर स्वरूपाची कारवाई केली जात आहे. मात्र सदर कारवाई चुकीची असून अशा परिस्थितीत व्यवसाय करणे कठीण आहे. ज्या कृषी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.निवेदन देताना कुरखेडा, कोरची तालुका अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश भटड्ड, उपाध्यक्ष बी. के. लोणारे, कमल खंडेलवार, सचिव विकास भटड्ड, परसराम नाट, गिरेश्वर उईके, गजेंद्र भटड्ड, भोजराज बन्सोड, विद्येश्वर बावनथडे, सुधाकर भरणे, कार्तिक रॉय, दिनेश गजभिये, चुन्नीलाल दरवडे, एकनाथ मेश्राम उपस्थित होते.आरमोरी तालुका अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार धाईत यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.धानोरा तालुका असोसिएशनच्या वतीने गुरूवारी कृषी केंद्र बंद ठेवण्यात आले, अशी माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष बशीर पिराणी यांनी दिली. कृषी केंद्र चालकांवर पोलीस व प्रशासनामार्फत राज्यात केली जात असलेली कारवाई योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. धानोरा तालुक्यातील रांगी, मुरूमगाव, पेंढरी, चातगाव, मोहली, कारवाफा आदी ठिकाणी कृषी केंद्र बंद ठेवण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकºयांना विविध वस्तूंसाठी अडचणींचा सामना करावा लागला.