शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप वीज जोडणी थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:31 IST

ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणतर्फे उघडलेली विशेष मोहीम थंडबस्त्यात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या चकरा वाढल्या : वर्षभरापासूनचे अर्ज कार्यालयात धूळखात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणतर्फे उघडलेली विशेष मोहीम थंडबस्त्यात आहे.शासनाकडून अनुदानावर विहीर उपलब्ध होत आहेत. विहिरीतील पाण्याचा उपसा करून पीक घेण्यासाठी शेतकरी इच्छुक आहेत. ज्या शेतकºयांना विहीर प्राप्त झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी वीज जोडणी मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. वीज जोडणीसाठी आवश्यक असलेले डिमांड सुध्दा भरले आहेत. वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने वर्षभरापूर्वी मोहीम उघडली होती.मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही महावितरणने वीज जोडणी उपलब्ध करून दिली नाही. काही शेतकऱ्यांनी विहिरीचे खोदकाम झाल्यानंतर पंप खरेदी केले. मात्र वीज जोडणी झाली नसल्याने खरेदी केलेल्या पंपाचे पैसे शेतकऱ्यांच्या उरावर बसले आहेत. एकीकडे शासन सिंचनाची सुविधा वाढावी, यासाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे वीज विभागाच्या दुर्लक्षामुळे वीज जोडणी होण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. वैरागड परिसरात शेकडो शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या आहेत. या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. सदर अर्ज कार्यालयात पडून आहेत. वीज जोडणीसाठी वीज कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.मागेल त्याला वीज जोडणी अभियान फेलवीज वितरण कंपनीकडे पुरेशा प्रमाणात मीटर नसल्याने शेतकऱ्यांचे अर्ज वर्षनोवर्ष पडून राहत होते. एक महिन्यापूर्वी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणी होताच जुने मीटर बदलवून दिले जाईल. त्याचबरोबर नवीन मीटर लावून दिले जाईल, असे कळविले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात परिस्थिती भिन्न असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी व घरगुती ग्राहकांनी अर्ज करून सुध्दा वीज जोडणी दिली जात नसल्याचे दिसून येत आहे.वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकरी व घरगुती ग्राहकांची निकाली काढण्याची मागणी होत आहे.