शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेंशनसाठी आंदोलन तीव्र करणार

By admin | Updated: July 12, 2017 01:28 IST

जुनी पेंशन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, यासाठी राज्यभरात आंदोलन तीव्र केले जाईल,

जुन्या पेंशन योजनेसाठी लढा : अधिवेशनादरम्यान कर्मचाऱ्यांनी केला निर्धार लोकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली : जुनी पेंशन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, यासाठी राज्यभरात आंदोलन तीव्र केले जाईल, असा निर्धार महाराष्ट्र राज्य पेंशन हक्क संघटनेच्या अधिवेशनात करण्यात आला. यावेळी वितेश खांडेकर, राज्य कमिटीचे शैलेश राऊत, नदीम पठाण, आशितोष चौधरी, वाघ उपस्थित होते. अधिवेशनादरम्यान डीसीपीएस, एनपीएस योजना लागू करण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांच्या घरासमोर घंटानांद, घेराव, मोर्चा आंदोलन काढण्यात येईल. जिल्हास्तरीय अधिवेशन घेण्यात येईल आदी ठराव पारित करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील योगेश शेरेकर, नाशिक मधील राजेश कडू, सुशील गायकवाड यांची सर्वानुमते राज्य कमिटीवर निवड करण्यात आली. यावेळी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीचे गुरूदेव मुनघाटे, दशरथ पाटील, मनीष कावळे, नितीन कुमरे, सतीश खाटेकर, रमेश रामटेके, बापू नवघडे, अंकूश मैलारे आदी उपस्थित होते. नितीन कुमरे यांच्यावर वन विभाग संघटनेचे तर रमेश रामटेके व सतीश खाटेकर यांच्याकडे दक्षिण गडचिरोली मधील इतर विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना खांडेकर यांनी वर्षभरात संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या लढ्यांची माहिती दिली. भविष्यातील धोके लक्षात घेऊन हा लढा आणखी तीव्र करण्यासाठी संघटनेची ताकद वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सभासद करण्याचे आवाहन खांडेकर यांनी मार्गदर्शन करताना केले.