शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा सुरू झाला प्लास्टिकचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:02 IST

प्लास्टिक हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्लास्टिकचे मोठमोठे ढीग बघायला मिळतात. तसेच प्लास्टिक जाळल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे सर्व तोटे लक्षात घेता राज्य शासनाने ५० मायक्रोेनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे.

ठळक मुद्देमोहीम थंडावल्याने विक्रेते निर्धास्त : धडक मोहीम सुरू करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य शासनाने प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. काही विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक वापरणे कायद्यान्वये गुन्हा ठरविला आहे. मागील वर्षी प्रतिबंधित प्लास्टिक पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. यावर्षी मात्र ही मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे.प्लास्टिक हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्लास्टिकचे मोठमोठे ढीग बघायला मिळतात. तसेच प्लास्टिक जाळल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे सर्व तोटे लक्षात घेता राज्य शासनाने ५० मायक्रोेनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. याबाबत राज्य शासनाने २ जुलै २०१८ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेत प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे. राज्य शासनाने परिपत्रक निर्गमित केल्यानंतर महापालिकेने मागील वर्षी परिपत्रक निर्गमित केले. या परिपत्रकानंतर नगर पालिकेने प्लास्टिक व थर्माकोल जप्त करण्याची मोहीम हाती घेतली होती. याला दुकानदारांनीही चांगला प्रतिसाद दर्शविला. त्यानंतर मात्र नगर पालिकेने प्लास्टिक जप्तीची मोहीम जवळपास बंदच केली आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर वाढला आहे.विशेष म्हणजे प्लास्टिक जप्तीबरोबरच नागरिकांमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणांमाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी नगर पालिका प्रशासनाने विशेष पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.वर्षभरात केवळ पाच क्विंटल प्लास्टिक जप्तप्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने मागील वर्षी पथक तयार केले होते. या पथकाने २०१९ या वर्षभरात सुमारे १२० आस्थानांची तपासणी केली. त्या तपासणीमध्ये ३२ आस्थापनांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होत असल्याचे दिसून आले. या दुकानांमधून सुमारे ४३९ किलो प्लास्टिक जप्त केली आहे. तसेच त्यांच्याकडून ३६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर मात्र मोहीम थंडावली आहे.दंड व कारवासाची शिक्षाप्लास्टिक व थर्माकोल बंदीचा कायदा कडक करताना राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करणाऱ्यांवर दंड व कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद केली आहे. पहिला गुन्हा केल्यास पाच हजार रुपये, दुसºया गुन्ह्यास दहा हजार रुपये व तिसºया गुन्ह्यास २५ हजार रुपये दंड व तीन महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. मात्र या नियमानुसार कारवाई होत नसल्याने शहरात पुन्हा खुलेआम प्लास्टिकचा वापर सुरू झाला आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी मोहीम उघडण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी