शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

छाननीत २६ उमेदवारी अर्ज बाद

By admin | Updated: February 3, 2017 01:13 IST

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३५ जिल्हा परिषद व ७० पंचायत समिती गणात निवडणूक होऊ घातली आहे.

पक्षीय उमेदवारांनाही फटका : पहिल्या टप्प्यात जि.प.चे ९ तर पं.स.चे १७ नामांकन अवैधगडचिरोली : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३५ जिल्हा परिषद व ७० पंचायत समिती गणात निवडणूक होऊ घातली आहे. गुरूवारी या क्षेत्रातील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया स्थानिक तहसील कार्यालयात पार पडली. आठ तालुक्यांतून जिल्हा परिषदकरिता असलेले ९ उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. तर पंचायत समितीकरिता १७ उमेदवारी अर्ज रद्द झाले आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. छाननीत गडचिरोलीत काँग्रेस तर मुलचेरात भाजपच्या उमेदवारांचा अर्ज रद्द झाला. याशिवाय चामोर्शी तालुक्यात भाकप उमेदवाराचेही अर्ज रद्द झाले.गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अर्ज कटलाछाननी प्रक्रियेदरम्यान गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या हेमलता स्वामी डोंगरे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यांनी अर्जामध्ये दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडून साक्षांकीकरण करून घेतलेले नव्हते. तर नायब तहसीलदारांकडून ते केले असल्याने तांत्रिक बाबीवर त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. गडचिरोली येथे रासपकडून भरलेल्या बंडोपंत मल्लेलवार यांच्या अर्जावर पक्षानेच आक्षेप घेतलाचामोर्शीत सहा अर्ज रद्दचामोर्शी तालुक्यात एकूण ४७ उमेदवारांचे अर्ज छाननीत स्वीकृत करण्यात आले आहेत. दोन जिल्हा परिषद क्षेत्रातील उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. हळदवाही-रेगडी जि.प. क्षेत्रातून भाकपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणारे पुंगाटी मंचू बुचय्या यांचा उमेदवारी अर्ज शपथपत्र अभिसाक्षांकीत नसल्याने रद्द करण्यात आला आहे. तर आष्टी-इल्लूर जिल्हा परिषद क्षेत्रातून बीआरएसपीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे कुकडकर मोहना प्रकाश यांचाही अर्ज याच कारणासाठी अवैध ठरविण्यात आला आहे. तर पंचायत समितीसाठी ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ७५ अर्ज वैध ठरले आहेत. चार उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. यात कुरूळ क्षेत्रातून काँग्रेसच्या सोमनकर रेखा सुरेंद्र यांनी अर्जासोबत शपथपत्र दुसऱ्याचे जोडल्याने त्यांचा अर्ज रद्द झाला. तर हळदवाही क्षेत्रातून भाकपच्या नरोटे लिलाबाई मानू यांनी शपथपत्र सर्टीफाईट (सांक्षाकित केलेले नसल्याने) त्यांचा अर्ज अवैध ठरला. रेगडी क्षेत्रातूनही भाकपचे वैरागडे संगीता रूपेश यांचाही अर्ज याच कारणासाठी रद्द करण्यात आला तर आष्टी पं. स. गणातील अपक्ष उमेदवार इजमनकर उमाजी जानकीराम यांनीही अभिसाक्षांकित केलेले नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. पं.स.साठी चार अर्ज अवैध झाले आहे.धानोरात सहा अर्ज बादधानोरा तालुक्यात पंचायत समितीसाठी ४२ व जिल्हा परिषदेसाठी २६ नामांकन अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये पंचायत समितीचे सहा नामांकन बाद झाले आहेत. यामध्ये पेंढरी पं.स. गणातून काँग्रेसच्या उमेदवार पवार रोशनी स्वप्नील, मुरूमगाव पं.स. गणातून अपक्ष उमेदवार गणपत कोल्हे, मुस्का गणातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरलेले आचला देवाजी, येरकड पं.स. गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार मंगला उईके, कारवाफा पं.स. गणातून अपक्ष उमेदवार परसे चंद्रकला दुधराम व गट्टा पं.स. गणातून अपक्ष उमेदवार मडावी प्रेमिला केशव यांचे नामांकन रद्द झाले आहे. जिल्हा परिषद क्षेत्रातून मात्र कोणाचेही नामांकन रद्द झाले नाही.कोरचीत तीन अर्ज बादकोरची तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन क्षेत्रात व पंचायत समितीच्या एका गणात तीन उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत गुरूवारी रद्द करण्यात आले. कोरची तालुक्यात कोटरा-बिहिटेकला व बेडगाव-कोटगूल हे जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. बेडगाव-कोटगूल क्षेत्रात शिवसेनेचे उमेदवार वनिता विजय घुग्गुसकर व अपक्ष हेमलता विठ्ठल शेंडे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. वनिता विजय घुग्गुसकर यांना २००२ नंतर चार अपत्य असल्याचा आक्षेप भाजपच्या वतीने घेण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला तर हेमंताबाई शेंडे यांनी अपत्या संबंधीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडले नसल्याने त्यांचाही अर्ज रद्द करण्यात आला आहे. तर बिहिटेकला पं.स. गणातून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे घाटघुमर मेहतरू थनूराम यांनी त्या गणातील सूचक आपल्या अर्जावर न घेता कोरची नगर पंचायतीच्या क्षेत्रातील सूचक घेतल्यामुळे त्यांचाही उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण तीन उमेदवारी अर्ज छाननीत रद्द झाले आहेत.कुरखेडात दोन अर्ज बादकुरखेडा तालुक्यात पं.स. गणाकरिता ५० नामांकन जि.प. क्षेत्राकरिता २७ नामांकन दाखल केले होते. छाननी दरम्यान पुराडा पं.स. गणातून अपक्ष उमेदवार मरकाम राजेंद्रसिंह श्यामसुंदरसिंह यांनी जातीचा दाखला न जोडल्याने अर्ज रद्द करण्यात आला तर बोरकर लहरीदास नामदेव यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा पोचपावती सादर न केल्याने त्यांचे नामांकन रद्द झाले आहेत. आरमोरीत जि.प.चे तीन तर पं.स. दोन अर्ज अवैधआरमोरी तालुक्यात ठाणेगाव-इंजेवारी जिल्हा परिषद क्षेत्रातून प्रिती किसनराव शंभरकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून भरलेला उमेदवारी अर्ज एबी फार्म न जोडल्याने रद्द झाला आहे. मात्र त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले दोन नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आले आहे. याच क्षेत्रातून वारके रेखा सुरज यांनी काँग्रेस व अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचा एबी फार्म न जोडल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आलेला आहे. मात्र अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम आहे. तसेच याच क्षेत्रातून महाजन रत्नमाला तुळशीराम यांनी शिवसेनेचा भरलेला उमेदवारी अर्ज एबी फार्म न जोडल्याने रद्द झाला आहे. त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम आहे. अरसोडा पं. स. गणातून कांदोर विवास श्रीराज यांनी शिवसेनेकडून भरलेला अर्ज एबी फार्म न जोडल्यामुळे अवैध ठरविण्यात आला आहे. वडधा पं.स. गणातून बसपाचे गोलू अनिल भोयर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र न जोडल्याने अवैध ठरविण्यात आला आहे.देसाईगंज येथे एकही उमेदवारी अर्ज अवैध ठरला नसल्याची माहिती स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.मुलचेरात जि.प.चा एक तर पं.स.चे दोन अर्ज अवैधमुलचेरा तालुक्यातील ३ जिल्हा परिषद गटासाठी १८ नामनिर्देशन व पंचायत समितीसाठी २६ नामनिर्देशन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. गुरूवारी उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी पार पडली असून जिल्हा परिषदचे १ तर पंचायत समितीच्या २ उमेदवारांचे नामनिर्देशन ठरले अवैध आहेत. या छाननीला सर्व उमेदवार उपस्थित होते.सुरुवातीला जिल्हा परिषदच्या तिन्ही गटाची छाननी करण्यात आली. त्यामध्ये सुंदरनगर -गोमणी या गटातून शिवसेनेचे उमेदवार अमूल म्रिदुल घोष यांच्या नामनिर्देशन पत्रात सूचकाने स्वाक्षरी न केल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले. उर्वरित दोन गटात ज्या उमेदवारांनी दोन-दोन अर्ज सादर केला होते त्यांचे एक नामनिर्देशन पत्र वैध घोषित करण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील ६ पंचायत समिती गणातील नामनिर्देशन पत्र तपासणीला सुरुवात झाली सुंदरनगर गणातून भाजपच्या उमेदवार लक्ष्मीकांता कार्तिक गरतुलवार यांच्या नामनिर्देशन पत्रात सूचक म्हणून गजानन येलमूलवार यांचे नाव होते. मात्र ते गोमणी गणातील रहिवासी असल्याने लक्ष्मीकांता गरतुलवार यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे निवडणूक अधिनियम १९६१ अंतर्गत नियम १९६२ कलम १६ उपकलम-२ अन्वये त्यांचा नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आला आहे. कोठारी गणातून गौरी तुळशीराम कडते या उमेदवाराचे सूचक सुलोचना सुरेश कडते सुद्धा सुंदरनगर मतदार संघातील असल्यामुळे त्यांचा नामनिर्देशन पत्र अवैध घोषित करण्यात आला आहे. उमेदवार तालुक्यातील कुठलेही असले तरी ज्या गणातून उभे राहणार आहेत. त्या गणातील सूचक असणे बंधनकारक आहे अन्यथा त्या गणातील एकही मतदार उमेदवारांच्या बाजूने नसल्याचे समजून त्या उमेदवारांचा नामनिर्देशन अवैध ठरवला जातो . सर्व उमेदवारांचे मुळ कागदपत्रे सुद्धा तपासण्यात आले व अवैध ठरले ल्या उमेदवारांना न्यायालयात दाद मागण्याची मुद्दत सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी विजय मुळीक यांनी समजावून सांगितली.