शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

आमदारांच्या विनंतीनंतर तलाठ्यांचे आंदोलन मागे

By admin | Updated: June 14, 2016 01:01 IST

आमदार देवराव होळी यांनी तलाठ्याला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप करीत या प्रकरणी आमदारांवर

गडचिरोली : आमदार देवराव होळी यांनी तलाठ्याला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप करीत या प्रकरणी आमदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी ६ जूनपासून आंदोलनाला सुरूवात केली होती. दरम्यान, आ. होळी यांनी १३ जून रोजी दुपारी ४ वाजता गडचिरोली येथील तलाठ्यांच्या आंदोलन स्थळाला भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर तलाठ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्याचबरोबर एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीसुध्दा मागे घेतल्या. कठाणी नदीवरील रेती घाटावरून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांविरोधात उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नेतृत्वात तलाठ्यांनी कारवाई केली होती. याचदरम्यान आमदार डॉ. देवराव होळी हे सुध्दा त्या ठिकाणी पोहोचले होते. आमदार व तलाठी यांच्यामध्ये बाचाबाची होऊन त्यांनी एकमेकांविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. जिल्हाभरातील तलाठ्यांनी ६ जूनपासून लेखणी बंद आंदोलन व १० जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. शेतीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध दाखले तलाठ्यांकडून मागावे लागतात. अशातच तलाठ्यांनी आंदोलन सुरू केल्याने सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील मंडळ अधिकारी कार्यालयासमोरील तलाठ्यांच्या धरणे आंदोलनाला सोमवारी भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना आपल्या दोघांच्या भांडणामुळे जनतेचे हाल होत आहेत. हे योग्य नसून विकासाला मारक ठरणारे आहे. त्यामुळे तलाठ्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. त्यानंतर तलाठ्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. तक्रारकर्ते तलाठी अजय तुंकलवार व आमदार डॉ. देवराव होळी या दोघांनीही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकमेकांच्याविरोधातील तक्रारी मागे घेतल्या. आंदोलन स्थळाला आमदारांनी भेट दिली. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अनिल पोहोणकर, विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष के. पी. ठाकरे, उपाध्यक्ष पी. टी. तुलावी, सहसचिव व्ही. व्ही. बोंडे, एन. जी. वाते, मंडळ अधिकारी प्रकाश डांगे, बी. ए. बांबोळे, विलास बारसागडे, महेश गेडाम, अजय तुंकलवार, गणेश खांडरे यांच्यासह तालुक्यातील तलाठी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)तलाठ्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी मध्यस्ती केली होती. राज्यात आपलेच सरकार आहे. आंदोलनामुळे सामान्य जनतेचे हाल होऊ नयेत, ही बाब लक्षात घेऊन आपण प्रत्यक्ष आंदोलनस्थळाला भेट दिली व तलाठ्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.- डॉ. देवराव होळी, आमदार गडचिरोली