शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जप्तीच्या कारवाईनंतरही वसुली घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:18 IST

यावर्षी पहिल्यांदाच नगर परिषदेत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहीम सुरू केली होती. मात्र त्यानंतरही नगर परिषदेला मागील वर्षी एवढी सुध्दा वसुली करणे शक्य झाले नसून मालमत्ता कर वसुलीचा आकडा ३१ मार्चअखेर ६९.५५ टक्क्यांवर थांबला आहे.

ठळक मुद्देगडचिरोली नगर पालिकेची स्थिती : केवळ ६९.५५ टक्के मालमत्ता कर वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी पहिल्यांदाच नगर परिषदेत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहीम सुरू केली होती. मात्र त्यानंतरही नगर परिषदेला मागील वर्षी एवढी सुध्दा वसुली करणे शक्य झाले नसून मालमत्ता कर वसुलीचा आकडा ३१ मार्चअखेर ६९.५५ टक्क्यांवर थांबला आहे. मागील वर्षी सुमारे ८०.३६ टक्के मालमत्ता कराची वसुली झाली होती.गडचिरोली हे जिल्हास्तरावरील शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालये आहेत. शासकीय कार्यालयांना वेळेवर अनुदान मिळत नाही. त्यामुळे या शासकीय कार्यालयांकडे मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकला आहे. त्याचबरोबर शहरातील काही नागरिकांकडेही पाच ते सहा वर्षांपासून मालमत्ता कर थकले होते. मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली व्हावी, यासाठी नगर परिषदेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी महिनाभर जप्तीची मोहीम राबविली होती. त्यामुळे वसुलीचा आकडा किमान ९० टक्क्यांच्या वर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आर्थिक वर्षाच्या अखेर केवळ ६९.५५ टक्के वसुली झाली आहे. मालमत्ता कराची एकूण मागणी २ कोटी ५४ लाख ४ हजार ४७२ आहे. आर्थिक वर्षाअखेर १ कोटी ७६ लाख ६८ हजार २४३ रूपयांची वसुली झाली आहे. मागील वर्षी मालमत्ता कराची वसुली ३ कोटी ९६ लाख ८२ हजार ४२२ रूपये होती. त्यापैकी ३ कोटी १८ लाख ९० हजार ५०९ रूपये वसुली झाली. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८०.३६ टक्के एवढे आहे. मागील वर्षी पाणीपट्टी वसुली मात्र ५१.३९ टक्के एवढीच होती.पाणीपट्टी वसुलीत उच्चांकमागील वर्षी पाणीपट्टी वसुली केवळ ९१.३९ टक्के होती. यावर्षी मात्र पाणीपट्टीची वसुली सुमारे ९८.९२ टक्क्यांवर पाहोचली आहे. पाणीपट्टी कराची एकूण मागणी १ कोटी ६७ लाख ५६ हजार ५०५ रूपये होती. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत १ कोटी ६५ लाख ७६ हजार २९७ रूपये एवढी कर वसुली झाली आहे. मालमत्ता कराच्या तुलनेत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण चांगले आहे.नोटाबंदीने मागील वर्षी तारलेकितीही प्रयत्न केले तरी मालमत्ता कराची वसुली ७५ टक्केपेक्षा अधिकचा आकडा पार करीत नाही. हा दरवर्षीचा अनुभव आहे. एकूण मात्र मागील वर्षी अचानक मालमत्ता कराची वसुली ८०.३६ टक्क्यांवर पोहोचली होती. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे, नोटबंदी आहे. ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी झाली. बंद झालेल्या पाचशे व एक हजार रूपयांचा नोटा मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी स्वीकारल्या जातील, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. बँकेत नोटा जमा करण्यासाठी प्रचंड गर्दी राहत असल्याने नागरिकांनी नगर परिषदेकडे जुन्या नोटांच्या माध्यमातून मालमत्ता कर भरला. त्यामुळे मागील वर्षी मालमत्ता कराचा आकडा ८० टक्क्यांवर पोहोचला.