शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

लोकसभेनंतर १६ हजार मतदारांची भर

By admin | Updated: October 3, 2014 01:34 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर १६ हजार ७६२ नवीन मतदारांची भर पडली आहे.

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर १६ हजार ७६२ नवीन मतदारांची भर पडली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या तिनही मतदार संघात ७ लाख ३१ हजार १०५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात तिनही मतदार संघात १६ हजार ७६२ नवीन मतदारांची भर पडली आहे. १ जानेवारी २०१४ या दिनांकाच्या अर्हतेवर १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांची नोंदणी करण्याची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली. त्यानुसार ७ लाख ३१ हजार १०५ मतदार जिल्ह्याच्या तिनही विधानसभा मतदार संघात मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.जिल्ह्यात तिनही विधानसभा क्षेत्रानुसार मतदार ेकेंद्रांची वर्गवारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात तिनही विधानसभा क्षेत्रात असलेल्या एकूण मतदार केंद्राची माहिती निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. यानुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात १२८ मतदार केंद्र साधारण, ८६ मतदार संघ संवेदनशील तर ६४ मतदार संघ अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मतदार संघातील एकूण २७८ मतदान केंद्रांपैकी १२ मतदान केंद्र अस्थायी स्वरूपात ठेवण्यात आले आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २२८ मतदान केंद्र साधारण तर ५३ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर ४८ मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील एकूण ३२९ मतदान केंद्रापैकी ९ मतदान केंद्र अ‍ॅक्झलरीज पोलिंग स्टेशन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात ८२ मतदान केंद्र साधारण, १०७ मतदान केंद्र संवेदनशील तर ९७ मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात एकूण २८६ मतदान केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात साधारण मतदान केंद्र ४३८, संवेदनशील २४६ तर अतिसंवेदनशील २०९ केंद्रांचा समावेश आहे. तिनही विधानसभा क्षेत्रातील एकूण ८९३ मतदान केंद्रांपैकी २१ मतदान केंद्रात वेळीच बदल होऊ शकतो, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.१ जानेवारी २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या घोषित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात ७ लाख ३१ हजार १०५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रात १ लाख २२ हजार ३०३ पुरूष मतदार तर १ लाख १६ हजार ३८९ महिला मतदारांचा समावेश आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात २ लाख ३८ हजार ६९२ मतदार आहेत. यापैकी २ लाख २७ हजार ३८४ मतदारांचे छायाचित्र यादीवर अपलोड करण्यात आले आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १ लाख ४३ हजार ३० पुरूष मतदार तर १ लाख ३४ हजार ७० महिला मतदार आहेत. या विधानसभा क्षेत्रातील एकूण २ लाख ७७ हजार १०० मतदारांपैकी २ लाख ६९ हजार ६३८ मतदारांचे यादीवरील छायाचित्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात पुरूष मतदारांची एकूण संख्या १ लाख १० हजार ७१७ तर महिला मतदारांची एकूण संख्या १ लाख ४ हजार ५९६ आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील एकूण २ लाख १५ हजार ३१३ मतदारांपैकी २ लाख ८ हजार ६७७ मतदारांचे यादीवरील छायाचित्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात तिनही विधानसभा क्षेत्रात पुरूष मतदारांची संख्या ३ लाख ७६ हजार ५० आहे. तर महिला मतदारांची संख्या ३ लाख ५५ हजार ५५ आहे. जिल्ह्यात ७ लाख ३१ हजार १०५ मतदारांपैकी ७ लाख ५ हजार ६९९ मतदारांच्या यादीवरील छायाचित्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)