लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : उपपोलीस स्टेशन पेंढरी अंतर्गत येत असलेल्या कनेली, मुंगनेर, गोडलवाही, चिमरिकल, मंगेवाडा या गावात पोलिसांनी स्वतंत्र शिबिर घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.छत्तीसगड राज्यातील औधी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावातील चार नागरिकांची नक्षलवाद्यांनी नुकतीच हत्या केली. कनेली, मुंगनेर, गोडलवाही, चिमरिकल, मंगेवाडा ही गावे याच परिसरात येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस व सीआरपीएफच्या पथकाने या गावांमध्ये रात्र व दिवसा शिबिर आयोजित केले. या शिबिरादरम्यान स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. स्थानिक नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस, सीआरपीएफ सदैव तत्पर आहेत. दुर्गम भागातील अशिक्षित नागरिकांची नक्षलवादी फसवणूक करीत आहेत. येथील जंगलाच्या भरवशावर नक्षल्यांचे नेते कोट्यवधी रूपयांची माया जमवित आहेत. नक्षल्यांच्या विरोधामुळेच येथील परिसर अविकसित राहिला आहे. अविकसित भागातच नक्षल्यांना आपली पोळी शेकता येत असल्याने त्यांचा विकासाला विरोध आहे. ही बाब पोलीस व सीआरपीएफच्या अधिकाºयांनी नागरिकांच्या लक्षात आणून दिली असता, नागरिकही नक्षल्यांचा विरोध करीत असल्याचे दिसून आले.नागरिकांनी त्यांना भेडसावणाºया अडचणी पोलिसांसमोर मांडल्या. या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न आपण करू, असे आश्वासन अधिकाºयांनी दिले. यावेळी सीआरपीएफ अधिकाºयांनी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शिबिर लावून समस्या जाणल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:49 IST
उपपोलीस स्टेशन पेंढरी अंतर्गत येत असलेल्या कनेली, मुंगनेर, गोडलवाही, चिमरिकल, मंगेवाडा या गावात पोलिसांनी स्वतंत्र शिबिर घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
शिबिर लावून समस्या जाणल्या
ठळक मुद्देसीआरपीएफची कामगिरी : सुरक्षेचे दिले आश्वासन