शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

दिड महिन्यानंतरही लोहखनिजाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:25 IST

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे.

ठळक मुद्देरोजगाराअभावी मजुरांची होरपळ : अधिकारी, लोकप्रतिनिधींसह कंपनीने फिरविली पाठ?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे. हे काम तातडीने सुरू करण्यासाठी मजुरवर्गाने उपोषण सुरू केल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आमदार व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मजुरांना काम सुरू करण्यासंदर्भात आश्वासन दिले. मात्र त्याला तीन आठवडे लोटले तरी काम सुरू झाले नसल्यामुळे त्यांचे आश्वासन हवेतच विरते की काय, अशी भावना मजुरवर्गात व्यक्त होत आहे.गेल्या १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाºया एका ट्रक आणि बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातानंतर लोहखनिज काढण्याचे व वाहतुकीचे काम लगेच बंद करण्यात आले होते. पण काम बंद होताच शेकडो मजुरांचे हात रिकामे झाल्याने मजूरवर्गात असंतोष निर्माण झाला.लोहखाणीचे काम सुरू करण्याची मागणी करीत त्यांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला साकडे घातले. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर त्यांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. तिसºया दिवशी आ.डॉ.देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. बंद असलेले काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी उपोषण मागे घेतले. पण त्या आश्वासनाला तीन आठवडे लोटूनही हाताला काम मिळत नसल्याने मजुरांमधील असंतोष वाढत आहे.घोडे अडले कुठे? कारण गुलदस्त्यातसुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु करण्यास लॉयड मेटल्स कंपनी व जिल्हा प्रशासन तयार आहे. परंतू या कामासाठी लागणारे पोलीस संरक्षण मिळत नसल्यामुळे लोहखनिज प्रकल्पाचे घोडे अडल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहखनिज वाहतुकीसाठी स्थानिक स्तरावरील बेरोजगारांना ट्रकचे मालक बनविण्याचे स्वप्न दाखवत आपल्या हाताने ट्रकच्या चाव्या त्यांना दिल्या. परंतू प्रत्यक्षात त्या ट्रकला कामच मिळाले नाही तर त्यांच्या कर्जाचा हप्ता भरणार कसा? अशी शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे पुरेशी सुरक्षा मिळाल्यास महिन्यातून २५ दिवस काम देण्याची तयारी कंपनीकडून दाखविली जात आहे. त्यामुळे केवळ पोलीस संरक्षणाअभावी शेकडो मजुरांची मजुरी बुडत आहे, की यामागे अजून दुसरेच कोणते कारण आहे, याबाबत कोणीच जबाबदार व्यक्ती स्पष्टपणे बोलायला तयार नाही.