शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एका शिशुच्या मृत्यूनंतर दुसऱ्याला नागपुरात हलविले

By admin | Updated: December 27, 2014 01:39 IST

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावातील एका महिलेला दोन जुळे अपत्य झालेत. मात्र आरोग्य यंत्रणेकडून या महिलेला वेळीच सुविधा उपलब्ध न झाल्याने ..

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावातील एका महिलेला दोन जुळे अपत्य झालेत. मात्र आरोग्य यंत्रणेकडून या महिलेला वेळीच सुविधा उपलब्ध न झाल्याने तीच्या एका नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली. त्यानंतर गडचिरोली जिल्हा रूग्णालयातून या महिलेसह तिच्या एका शिशूला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. आरोग्य विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे हा प्रकार घडला आहे. सिरोंचा तालुक्यात तेलंगणा सीमेला लागून असलेल्या आसरअल्ली गावातील सारक्का गगुरी या महिलेची मंगळवारी आसरअल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुती झाली. त्यानंतर या महिलेला अंकिसा येथे पाठविण्यात आले. तेथून सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल व्हा, असा सल्ला देण्यात आला. मात्र गुरूवारी सिरोंचा येथून अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालयात भरती होण्याचा सल्ला देण्यात आला. सिरोंचा येथून अहेरी येथे हलविण्यासाठी १०८ क्रमांकाची टोल फ्री रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे आवश्यक असताना वैद्यकीय अधिकारी व वाहन चालक यांचे पद रिक्त आहे, अशी सबब देऊन आरोग्य प्रशासनाने सुरूवातीला प्रचंड टाळाटाळ केली. परंतु जनरेटा वाढल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली व लोकवर्गणी करून नागरिकांनी ३ हजार रूपये या महिलेला व तिच्या नातेवाईकला दिले. मात्र आज सकाळी अहेरी येथे या महिलेचा एक नवजात शिशू दगावला. जन्मलेल्या बालकाला ठेवण्यासाठी वरिल सर्व आरोग्य केंद्रामध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने या महिलेला आपले एक अपत्य गमवावे लागले. त्यानंतर या महिलेला अहेरी उपजिल्हा रूग्णालयातून गडचिरोली येथे गुरूवारी रात्री हलविण्यात आले. आज दिवसभर आयसीओमध्ये ठेवून बालकावर उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तत्काळ नागपूर येथे हलवावे लागले. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक प्रसुतीचे रूग्ण खेडे गावातून तालुक्यात व तालुक्यातून जिल्ह्यात पाठविले जातात. आरोग्य यंत्रणेची अनास्था या प्रकाराला कारणीभूत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)