शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नळ पाईपलाईन व टाकीची कामे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक बाब म्हणून पाणीपुरवठा, नळ पाईपलाईन व पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामांना परवानगी दिली आहे. पाणी ही माणसाची अत्यावशक गरज असल्याने ही कामे सुरू ठेवावी, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. गडचिरोली पालिकेअंतर्गत लाखो रुपयातून विसापूर व हनुमान वॉर्डात स्वतंत्र टाकीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही पाणीटाकी व नळपाईपलाईनची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पार पाडून वर्कआदेश देण्यात आले. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी हे काम सुरू करण्यात आले. मात्र कुशल मजूर उपलब्ध होत नसल्याने दोन्ही ठिकाणच्या पाणीटाकीचे काम रखडले आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे कुशल मजूर मिळेना : गडचिरोली शहराच्या काही भागात पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या संचारबंदीमुळे परराज्यातील कुशल मजूर स्वत:च्या गावात अडकून पडल्याने तसेच मोठ्या शहरातील कंत्राटदार अडकून पडले आहेत. परिणामी स्थानिकस्तरावर अनुभवी व कुशल मजूर मिळत नसल्याने गडचिरोली पालिकेअंतर्गत शहरात दोन पाणीटाकीचे तसेच वाढीव नळ पाईपलाईनची कामे प्रभावित झाले आहेत.कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक बाब म्हणून पाणीपुरवठा, नळ पाईपलाईन व पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामांना परवानगी दिली आहे. पाणी ही माणसाची अत्यावशक गरज असल्याने ही कामे सुरू ठेवावी, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. गडचिरोली पालिकेअंतर्गत लाखो रुपयातून विसापूर व हनुमान वॉर्डात स्वतंत्र टाकीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही पाणीटाकी व नळपाईपलाईनची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पार पाडून वर्कआदेश देण्यात आले. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी हे काम सुरू करण्यात आले. मात्र कुशल मजूर उपलब्ध होत नसल्याने दोन्ही ठिकाणच्या पाणीटाकीचे काम रखडले आहे.गडचिरोली पालिका प्रशासनाच्या वतीने इंदिरानगर व गोकुलनगर, विसापूरसह वाढीव नळ पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या संचारबंदीत कुशल मजूर मिळत नसल्याने हे काम रखडून पडले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.मार्गाच्या खोदकामाने नळाचे पाणी मिळेनागडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून मोठ्या यंत्राच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे. चामोर्शी मार्गावर शासकीय विज्ञान महाविद्यालय ते डाक विभागाच्या कार्यालयापर्यंत हे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान खोदकामामुळे चार ते पाच ठिकाणची नळपाईपलाईन फुटली आहे. परिणामी १० ते १२ कुटुंबांना नळाचे पाणी मिळत नसल्याची माहिती आहे. फुटलेली नळ पाईपलाईन दुरूस्तीसाठी मजूर उपलब्ध नसल्याने हे काम थांबले आहे.नवीन हातपंपाच्या खोदकामालाही लागला ब्रेककोरोनाच्या संचारबंदीत पाणीपुरवठ्याची कामे करण्यास परवानगी असली तरी वाहतुकीस परवानगी नाही. परिणामी मजुरांना नेता येत नसल्याने हातपंप खोदण्याचे काम थांबले आहे. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अनेकजण नवीन हातपंप खोदण्याचा व्यवसाय करतात. मात्र कोरोनाच्या संचारबंदीत हातपंप खोदण्याच्या या सर्व मशीन व वाहने जागच्या जागी थांबल्या असून नवीन हातपंप खोदण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे. शहरी भागात नळाचे पाणी मिळत नसल्याने अनेकांनी स्वत:च्या घरी हातपंप खोदण्याचा निर्णय घेतला. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हे काम सुद्धा थांबले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या