शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

उन्नतीचे दालन

By admin | Updated: June 15, 2014 23:31 IST

मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी ११ जिल्ह्यातील ३७ शेतकरी गटांना पॉवर टिलर, भात रोवणी, कोनोविडर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर व भात

कृषी यंत्र बँक : ३७ शेतकरी गटांनी धरली यांत्रिकीकरणाची कासगडचिरोली : मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी ११ जिल्ह्यातील ३७ शेतकरी गटांना पॉवर टिलर, भात रोवणी, कोनोविडर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर व भात कापणी आदी पाच यंत्रे ९० टक्के सवलतीवर पुरविण्यात आली आहे. कृषी विभागाच्या पुढाकाराने या शेतकरी गटांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. हे ३७ शेतकरी गट कृषी यंत्र बँक सेवा सुरू करणार असल्याने कृषी यंत्र बँक उन्नतीचे दालन ठरणार आहे. कोरची, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा या तालुक्यात प्रत्येकी ५ शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली आहे.तर धानोरा तालुक्यात १, एटापल्ली २, भामरागड १, अहेरी २, सिरोंचा तालुक्यात एका शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली आहे. या ३७ शेतकरी गटांना मानव विकास मिशन अंतर्गत कृषी विभागामार्फत शेती लागवडीची पाच यंत्रे ९० टक्के अनुदानावर पुरविण्यात आली आहे. सदर यंत्रााचा वापर शेती कामात कसा करायचा, याबाबतचे प्रशिक्षण कृषी विभागाने या गटातील शेतकऱ्यांना दिले आहे. हे शेतकरी गट यंदाच्या खरीप हंगामापासून सामुहिकरित्या यांत्रिकीकरणाद्वारे आधुनिक शेती करणार आहेत. या पलिकडेही रोवणी, कापणी, मळणी या कामासाठी त्यांच्याकडे असलेल्या कृषी यंत्र बँकेतून यंत्राचा पुरवठा भाडे तत्वावर करणार आहेत. जिल्ह्यात शेती लागवडीच्या कामासाठी दरवर्षी मजुराची टंचाई भासते. गडचिरोली शहरातून परिसरातील खेडेगावात दरवर्षी ट्रॅक्टर, आॅटो व इतर वाहनामध्ये बसवून रोवणी करण्यासाठी महिला मजुरांना नेले जाते. यात शेतकऱ्यांना वाहनाचे भाडे व वाढलेली मजुरी द्यावी लागते. परिणामी शेती लागवडीचा खर्च वाढतो. मजुराच्या टंचाईवर मात करून कमी खर्चात फायद्याची शेती व्हावी यासाठी यावर्षीपासून कृषी विभागाने यांत्रिकीकरणाचे पर्व जिल्ह्यात सुरू केले आहे. यंदा पहिल्या वर्षी ३७ शेतकरी गटांचे कृषी यंत्र बँकेतून आर्थिक स्वावलंबन व सक्षमीकरण करण्याचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. पुरूष शेतकरी गटांसोबतच महिला शेतकरी गटांनाही पुढील वर्षापासून मानव विकास मिशन अंतर्गत कृषी यंत्र ९० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार असून त्यांचेही सक्षमीकरण करण्याचा मानस कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यंत्राद्वारे शेतीची पूर्व मशागत, चिखलणी, रोवणी, निंदणी व कापणी आदी सर्व कामे करण्यात येणार आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५०० हेक्टर क्षेत्रात यंत्राद्वारे भात पिकाची लागवड करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)