शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी घेतले २४ विद्यार्थ्यांना दत्तक

By admin | Updated: October 13, 2016 02:46 IST

स्थानिक पंचायत समितीअंतर्गत सूरजागड केंद्रातील पुरसलगोंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बारमाही वाहणाऱ्या बांडे नदीपलिकडील

प्रेरणादायी उपक्रम : बांडे नदीपलीकडच्या गावातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातएटापल्ली : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत सूरजागड केंद्रातील पुरसलगोंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बारमाही वाहणाऱ्या बांडे नदीपलिकडील बोडमेट्टा, येडसगोंदी, आलुरटोला, कुसुमपल्ली व आलेगा या गावातील अनेक विद्यार्थी पटावर दाखल आहेत. मात्र बांडे नदीमुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडते. ही अडचण लक्षात घेऊन या शाळेचे मुख्याध्यापक सखाराम झोडे यांनी संबंधित गावातील २४ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. या विद्यार्थ्यांचा निवास, कपडे, शालेय साहित्य आदी व्यवस्था येथील शिक्षकांनी स्वत: उचलली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची गुणवत्ता नसल्याची सबब पुढे करून अनेक पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश खासगी शाळांमध्ये करीत असतात. परिणामी अनेक जिल्हा परिषद शाळांची विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. मात्र मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रयत्नामुळे पुरसलगोंदी शाळा याला अपवाद ठरली आहे. सूरजागड केंद्रातील पुरसलगोंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना २७ जून १९५४ मध्ये झाली. त्यावेळी या शाळेत केवळ आठ विद्यार्थी दाखल होते. यंदाच्या सन २०१६-१७ शैक्षणिक सत्रात या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी मिळून तब्बल १०२ विद्यार्थी दाखल आहेत. २७ जून २०११ रोजी सिरोंचा तालुक्यातील शिक्षक सखाराम झोडे हे मुख्याध्यापक म्हणून पुरसलगोंदी जि. प. शाळेत रूजू झाले. त्यावेळी त्यांनी या शाळेतील समस्या जाणून घेतल्या. पुरसलगोंदी शाळेत परिसरातील बोडमेट्टा, येडसगोंदी, आलेंगा, कुसुमपल्ली, पामाजीगुडा, नेंडर, मंगेर, टिटोळा, पालेटोला आदी गावातील ५० पेक्षा अधिक विद्यार्थी दाखल आहेत. यापैकी बोडमेट्टा, येडसगोंदी, आल्लुरटोला, कुसुमपल्ली, आलेगा आदी गावे बारमाही वाहणाऱ्या बांडे नदीपलिकडे आहेत. सदर बांडे नदीवर पूल बांधण्यात आला नाही. त्यामुळे नदीपलिकडील गावातून दररोज पुरसलगोंदीच्या शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. परिणामी पावसाळ्यात या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडते. विद्यार्थ्यांची शाळा बुडू नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या हेतूने नदीपलिकडच्या गावातील २४ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा धाडसी निर्णय मुख्याध्यापक सखाराम झोडे यांनी घेतला. सदर निर्णयाला शाळेतील कार्यरत शिक्षकांनीही साथ दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या पुरसलगोंदी जि. प. शाळेत सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत. दत्तक घेतलेल्या २४ विद्यार्थ्यांच्या भोजन व निवास व्यवस्थेसाठी सदर शिक्षक दर महिन्याला आपल्या वेतनातून चार ते सहा हजार रूपये जमा करतात. या पैशातून दत्तक घेतलेल्या २४ विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाते. सदर शाळेत मुख्याध्यापक सखाराम झोडे यांच्यासह व्ही. एच. बुद्धावार, पी. एम. केंद्रे, के. के. अम्मावार, सी. आर. वेडदा, व्ही. यू. वानखेडे आदी कार्यरत आहेत. पुरसलगोंदी शाळा परिसर नीलगिरी, करंजी, सीताफळ, पपई, तुळस आदीसह अनेक प्रकारची फुलझाडांनी हिरवेगार आहे. शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)समितीच्या सहकार्याने बांधले भोजन कक्षसन २०१५-१६ मध्ये शाळा व्यवस्थापन समिती व येथील शिक्षकांनी लोकवर्गणी गोळा करून १ लाख ३० हजार रूपये खर्चातून या शाळेत भोजन कक्ष व एका वर्गखोलीचे बांधकाम केले. याकरिता प्रत्येक शिक्षकांनी पाच हजार रूपयांची मदत केली. सदर शाळेतील विद्यार्थी पटसंख्या लक्षात घेता शासनाने या शाळेला समूह निवासी वसतिगृह मंजूर करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. पुरसलगोंदी शाळेच्या प्रगतीत तत्कालीन मुख्याध्यापक दीपक नागपूरवार यांचेही सहकार्य लाभले आहे.