शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या लोकसंख्येची माहिती प्रशासनाने केली सुधारित

By admin | Updated: August 1, 2014 00:17 IST

गडचिरोली जिल्ह्यातील इतर मागास वर्गीय व इतर यांची लोकसंख्या प्रशासनाने शासनाकडे चुकीचीपाठविली होती. याबाबत ओबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हा प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली

पालकमंत्र्यांचे निर्देश : ओबीसी संघर्ष कृती समितीच्या प्रयत्नाला यशगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील इतर मागास वर्गीय व इतर यांची लोकसंख्या प्रशासनाने शासनाकडे चुकीचीपाठविली होती. याबाबत ओबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हा प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली व लोकसंख्या सुधारित करून पाठवा, अशी मागणीही केली होती. त्यानंतर प्रशासनाने २८ जुलै रोजी इतर मागास वर्गीय व इतरांची लोकसंख्या ५ लाख २८ हजार ९५३ असल्याचे शासनाला तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कळविले आहे. ओबीसी संघर्ष कृती समितीच्या पाठपुराव्याचे हे यश आहे. ३ जुलै २०१४ च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनाने ओबीसी व इतर मागस वर्गीय यांच्या लोकसंख्येबाबतची माहिती पालकमंत्र्यांना चुकीची दिली होती. त्यानंतर याबाबत ओबीसी संघर्ष कृती समितीने प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला. आता प्रशासनाने सुधारित पत्र काढून २८ जुलै २०१४ ला पालकमंत्र्यांना नवी माहिती दिली आहे. त्यानुसार २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १० लाख ७२ हजार ९४२ एवढी आहे. त्यापैकी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या ४ लाख २३ हजार २४४ व अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या १ लाख २० हजार ७४५ असून उर्वरित व इतर मागास प्रवर्ग व इतरांची लोकसंख्या ५ लाख २८ हजार ९५३ आहे. नुकत्याच झालेल्या मराठा कुटुंबाच्या सर्व्हेक्षणाअंती गडचिरोली जिल्ह्यात मराठा कुटुंबाची लोकसंख्या १७ हजार १७८ आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २५ आॅक्टोबर २००२ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी गट क व गट ड (वर्ग ३ आणि ४) साठी सेवेत अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण ठेवण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला असून त्या अन्वये सरळ सेवा भरतीसाठी अनुसूचित जाती १२ टक्के, अनुसूचित जमाती २४ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के, विमुक्त जाती अ २ टक्के, भटक्या जमाती ब २ टक्के, भटक्या जमाती क २.५ टक्के, भटक्या जमाती ड १.५ टक्के, इतर मागास प्रवर्ग ६ टक्के आरक्षण ठेवण्यात आला आहे, अशी माहितीही पालकमंत्र्यांना निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविली आहे.