शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

प्रशासन लाभार्थ्यांच्या दारी

By admin | Updated: December 10, 2014 22:57 IST

आम आदमी विमा योजनेसाठी लाभार्थ्यांची शोधमोहीम ९ ते २० डिसेंबर दरम्यान राबविली जाणार असून या योजनेची सुरूवात पाटणवाडा येथून करण्यात आली आहे.

वैरागड : आम आदमी विमा योजनेसाठी लाभार्थ्यांची शोधमोहीम ९ ते २० डिसेंबर दरम्यान राबविली जाणार असून या योजनेची सुरूवात पाटणवाडा येथून करण्यात आली आहे. आम आदमी विमा योजनेंतर्गत शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा विमा काढला जातो. सदर योजना राज्य शासनाने २७ आॅक्टोबर २००७ पासून सुरूवात केली आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर, १ हेक्टर बागायत किंवा २ हेक्टर जमिनधारकाच्या पाल्यांना दिला जातो. या योजनेंतर्गत विद्यार्थ्याच्या संपूर्ण कुटुंबाला विमा संरक्षण देण्यात येते. १८ ते ५९ वयोगटात आकस्मिक मृत्यू, अपंगत्व आल्यास थोडाफार आर्थिक लाभ मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. विमाधारकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रूपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रूपये व अपंगत्व आल्यास ३७ हजार ५०० रूपये असे विमा संरक्षण देण्यात येते. याशिवाय ९ वी ते १२ वीचे शिक्षण घेणाऱ्या दोन अपत्यांना १०० रूपये महिना शिष्यवृत्तीसुद्धा देण्यात येते. वैरागड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या पाटणवाडा येथे गावबैठक बोलावून नागरिकांना या योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी तलाठी डी. एल. कुबडे, ग्रामसेवक घुटके, पोलीस पाटील परसराम कुमरे, सरपंच सेवानंद सहारे, एकनाथ सहारे, मन्सराम कुमरे, माणिक कुमरे, रामटेके उपस्थित होते.योजनांचा लाभ घेण्यासाठी आजपर्यंत नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेक दाखले जोडूनही अर्जात त्रुट्या दाखवून योजनांपासून वंचित ठेवल्या जात असल्याचा प्रत्येक नागरिकाचा अनुभव आहे. आम आदमी विमा योजनेबाबत मात्र या उलट परिस्थिती दिसून येत आहे. कर्मचारीच लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून योजनेची माहिती लाभार्थ्यांना देत आहेत. हे चित्र बघून पाटणवाडा येथील नागरिकही आश्चर्यचकीत झाले आहेत. पाटणवाडा गावाची २ हजार लोकसंख्या असून या गावातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याचा शोध घेऊन योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती लोकमतशी बोलतांना उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली. नागरिकांनीसुद्धा स्वत: अर्ज करावे, असे आवाहनही कर्मचाऱ्यांनी केले. (वार्ताहर)