शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शासनच झोपेत असल्याने प्रशासनही झोपले- धर्मरावबाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:05 IST

जिल्ह्यात आज कोणती विकास कामे सुरू आहेत किंवा नाहीत याच्याशी जिल्ह्याच्या सत्ताधारी नेत्यांना काहीही देणेघेणे नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आज कोणती विकास कामे सुरू आहेत किंवा नाहीत याच्याशी जिल्ह्याच्या सत्ताधारी नेत्यांना काहीही देणेघेणे नाही. शासनच झोपेत आहे, त्यामुळे प्रशासनही झोपले आहे. आमच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामेही या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होऊ शकलेली नाहीत, अशी खंत माजी मंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेत व्यक्त केली.गेल्या सरकारच्या कार्यकाळात आर.आर. पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यात अनेक कामे मंजूर होऊन झपाट्याने मार्गी लागली. ज्या प्रमाणात त्यावेळी जिल्ह्याला निधी मिळत होता तेवढा निधी गेल्या तीन वर्षात कधीही मिळाला नाही. नागरिकांनीच आता तो काळ आणि आताचा काळ याची तुलना करावी, असे आवाहन धर्मरावबाबांनी केले.सुरजागड पहाडीवर मोठ्या प्रमाणात असलेल्या लोहखनिज उत्खननातून आदिवासी नागरिकांचे उत्थान व्हावे यासाठी मी खनिकर्म खात्याचा मंत्री असताना या प्रकल्पाचा मंजुरी दिली होती. त्यामुळे या प्रकल्पाला माझा विरोध नाही. पण त्यातून आदिवासींना रोजगार निर्मिती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आदिवासी लोकांनी केवळ दगड फोडण्याचेच काम करावे का? त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे, पोकलँडने उत्खनन करण्याऐवजी आदिवासी लोकांना रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न व्हावेत. आदिवासींना ट्रक खरेदीसाठी कर्ज देऊन लोहखजिन उत्खननासाठी त्या ट्रक्सचा वापर करून त्याच्या मोबदल्यातून कर्ज फेडण्याची सोय करावी असा सल्लाही यावेळी धर्मरावबाबांनी दिला. पण हे सर्व करण्याची तळमळ ना प्रशासनात आहे, ना सरकारमध्ये. त्यामुळे पुढील निवडणुकीत नागरिकांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रपरिषदेला जि.प.सभापती भाग्यश्री आत्रामही उपस्थित होत्या.पवारांच्या विदर्भ दौºयाची सुरूवात गडचिरोलीतूनराष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विदर्भात ठिकठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. या दौºयाची सुरूवात गडचिरोलीपासून होत आहे. अनेक वर्षानंतर ते गडचिरोली जिल्ह्यात येणार असल्यामुळे राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर नागरिकांनाही त्यांच्या आगमनाची उत्सुकता असल्याचे यावेळी आत्राम यांनी सांगितले. पवार यांची जाहीर सभा बुधवार दि.१५ ला दुपारी १ वाजता अभिनव लॉन येथे होणार आहे.