शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लगाम आरोग्य केंद्रात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: September 24, 2016 03:05 IST

पाणी पुरवठा विभाग व वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यातील लगाम-बोरी येथील पाणी पुरवठा बंद असून

रूग्णवाहिकेतून आणतात पाणी : लगामबोरीची पाणी पुरवठा योजना १५ दिवसांपासून बंदमुलचेरा : पाणी पुरवठा विभाग व वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यातील लगाम-बोरी येथील पाणी पुरवठा बंद असून याचा फटका प्राथमिक आरोग्य केंद्रालाही बसला आहे. कर्मचाऱ्यांना व रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकमेव हातपंप असून तो सुध्दा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मागील दोन वर्षांपासून बंद आहे. हातपंप पाडून सबमर्शीबल पंप बसविण्यात आला. मात्र हातपंपात आतमध्ये जुनी मोटार गेल्याने हातपंप सुरू करता आला नाही. लगामबोरीचा पाणी पुरवठा १५ दिवसांपासून बंद असल्याने रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. सध्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची गर्दी वाढलेली आहे. दोन किमी अंतरावरील शाळेतून आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेने पाणी आणावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)पाणी सोडण्याची वेळ बदलापाणी पुरवठा विभागातर्फे सकाळी ७.३० ते ८ वाजतादरम्यान पाणी सोडण्यात येते. मात्र सकाळी शालेय विद्यार्थी, कर्मचारी या सर्वांना सकाळी ७ वाजता तयारी करावी लागते. नळ उशीरा सोडत असल्यामुळे विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी धावपळ होते. सध्याची वेळ बदलवून सकाळी ६.३० वाजता पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.महावितरण व पाणी पुरवठा विभागात दोषावरून कलगीतुरावीज वितरण कंपनीने लावलेल्या जनित्रामध्ये बिघाड असताना सुध्दा कंपनीचे कनिष्ट अभियंता मानायला तयार नव्हते. पाणी पुरवठा विभागाच्या संयंत्रामध्येच दोष आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून मशीन चेक करणे सुरू आहे. विजेचा दाब कमी असल्यामुळे मोटारपंप बंद आहेत. कमी विजेच्या दाबामुळे मशीनमधील काही पार्ट जळाले असे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता जी. डी. बारापात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बिघाड नेमका कुठे आहे, हे शोधण्यात पाच दिवस गेले. ब्रह्मपुरीवरून मिस्त्री बोलविण्यात आले, असे ते म्हणाले. ईएलसी जळाले ते चंद्रपूरवरून आणण्यासाठी तीन दिवस लागेल. दुरूस्तीचे काम सुरू असताना पाणी पुरवठा विभागाचे एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जलशुध्दीकरण केंद्राला भेट दिलेली नाही. कधी विजेचा कमी दाब तर खंडीत वीज पुरवठा तर कधी पाईपलाईन फुटणे याबाबीमुळे लगामबोरी येथील पाणी पुरवठा दीड महिन्यांपासून अधूनमधून बंद राहत आहे. गेली १५ दिवस पाणी पुरवठा ठप्प असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोष निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा विभागाचा कुणीही वाली राहिला नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा विभागाने तत्काळ बिघाड दुरूस्त न केल्यास पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.