शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

१४ शिक्षकांचे झाले समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:24 IST

सन २०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमधील एकूण १११ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

ठळक मुद्देपोर्टलवर भरली माहिती : विषयानुसार शिक्षक न मिळाल्याने दोन जागा रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमधील एकूण १११ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदावर करण्यासाठी सोमवारी स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समायोजन प्रक्रियेत रिक्त असलेल्या १४ जागांवर १४ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. उर्वरित रिक्त असलेल्या दोन जागांसाठी विषयानुसार शिक्षक उपलब्ध न झाल्याने या दोन जागा रिक्त राहिल्या आहेत.जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या समायोजन प्रक्रियेदरम्यान उपशिक्षणाधिकारी (माध्य) संजय भिलकर, साई कोंडावार, अमोल राजूरकर, प्रशांत तम्मेवार आदी उपस्थित होते.यावेळी इयत्ता पाचवीवर अध्यापन करणाºया दोन, इयत्ता सहावी ते आठवीकरिता सात आणि इयत्ता नववी ते दहावीसाठी पाच अशा एकूण १४ शिक्षकांचे रिक्त जागांवर समायोजन करण्यात आले.उर्वरित ९५ वर शिक्षकांच्या समायोजनासाठीची प्रक्रिया विभागस्तरावर करण्यात आली आहे. गडचिरोलीच्या माध्यमिक शिक्षण विभागाने नागपूर विभागात सर्वप्रथम समायोजनाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. समायोजन प्रक्रिया लवकर झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या संबंधित शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जि. प. च्या माध्यमिक शिक्षण विभागाने ही समायोजनाची प्रक्रिया राबविली.समायोजन झालेले शिक्षक२०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या १४ शिक्षकांचे जिल्ह्यातील खासगी शाळांमधील रिक्त जागांवर माध्यमिक शिक्षण विभागातर्फे समायोजन करण्यात आले. यामध्ये अरूण चौधरी, गंगा भोंगडे, हेमराज म्हस्के, वंदना जाधव, अर्चना धुर्के, बालीकदास जगझापे, इंदिरा वाळके, शारदा पारधी, हरेश बावनकर, अशोक गजभिये, रेवान बोरकुटे, सुधाकर दोनाडकर, कैैलास बोरकर, भीमराव मेश्राम आदी शिक्षकांचा समावेश आहे.