शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांचे समायोजन करा

By admin | Updated: December 27, 2014 01:42 IST

मागील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त ठरलेल्या १६२ मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

अहेरी : मागील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त ठरलेल्या १६२ मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या पटपडताळणीनुसार जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या एकूण २६३ मुख्याध्यापकांपैकी १६२ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. तर एकूण ३ हजार ९११ शिक्षकांपैकी २४१ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षकांची पदे शिक्षण हक्क कायद्यानुसार वाढत आहेत. जिल्ह्यात ३०४ पदवीधर शिक्षक आहेत. प्रत्यक्षात मात्र ७९५ पदे मंजूर आहेत. त्यामुळे ४९१ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एक वर्षाचा कालावधी लोटूनही शिक्षक व मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले नाही. उलट खासगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद शाळांमध्ये केले जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रथम सेवा देत असलेल्या शिक्षकांचे समायोजन न करता खासगी शिक्षण संस्थेतीतील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या समायोजनाला प्राधान्य का दिला जात आहे, असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. खासगी संस्थांमधील शिक्षकांना तालुकास्थळानजीकच्या शाळांमध्ये रूजू करून घेतल्या जात आहे. त्यामुळे यानंतर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे समायोजन झाल्यास त्यांना दुर्गम भागात पाठविले जाण्याची शक्यता आहे. हा एक प्रकारचा जिल्हा परिषद शिक्षकांवर होत असलेला अन्याय आहे. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांचे समायोजन करीत असताना शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी केली आहे. हा अन्याय दूर न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)