शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनी स्वत: निर्णय घ्यावा

By admin | Updated: November 18, 2016 01:20 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात सुरजागड लोहखनिज प्रकल्पाबाबत कारखानदाराबरोबर करार झाला आहे.

पालकमंत्र्यांचे आवाहन : लोहप्रकल्पावर दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहाएटापल्ली : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात सुरजागड लोहखनिज प्रकल्पाबाबत कारखानदाराबरोबर करार झाला आहे. या करारामुळे उत्खनन करून ते कुठेही माल नेऊन प्रकल्प उभा करू शकतात. हा करार करणारे लोक आज सत्तेतून बाहेर गेल्यावर हा प्रकल्प येथेच झाला पाहिजे, अशी भूमिका घेत आहेत व आदिवासी जनतेला अडचणीत आणत आहेत. पेसा कायद्यांतर्गत या खनिज संपत्तीवर तुमचा अधिकार असल्याचे सांगून सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम काही राजकीय नेते व स्वयंघोषीत संघटना करीत असल्याचा घणाघाती आरोप गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केला. बुधवारी हेडरी या अतिदुर्गम भागातील ७० गावातील नागरिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.याप्रसंगी पं.स.चे सभापती दीपक फुलसंगे, रमेश लेकामी, डोलू दुर्वा, भाजपा तालुका अध्यक्ष नवीन बाला, पोलीस पाटील देऊजी पुसा कवडो, रमा लेकामी, चंद्राजी सडमेक, कल्पना आलाम, दिलीप मट्टामी, मुन्सी हिचामी, उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव, रावजी आलाम, चंदू दोरपेटी, बाबुराव गंप्पावार, रघुजीत तलांडे, उलगे कवडो, सचिन पेदापल्लीवार, सरीता कोटा, सुधाकर आत्राम आदी उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प येथेच झाला पाहिजे किंवा येथील खनिज बाहेर नेऊन प्रक्रिया करावी लागेल, याबाबत जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आपण उभे राहू. येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे ही आपली भूमिका असून खनिज संपत्तीची ३० टक्के रक्कम स्थानिक विकासावर खर्च करायची आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता स्थानिक नागरिकांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. याप्रसंगी लोह खनिजाच्या उत्खनन कामावर जाणाऱ्या ४०० मजुरांसोबतही पालकमंत्र्यांनी संवाद साधला. (शहर प्रतिनिधी)