शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत आदिवासी व बहुजन महिलांच्या वेदनांना फोडली वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:33 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तसेच बहुजन महिलांच्या विविध समस्या व त्यांच्या जीवनातील वास्तव मांडणारी कवीयित्री म्हणजे गडचिरोली येथील कुसूम अलाम होय.

ठळक मुद्देमहिला व बालकांच्या सन्मानार्थ २३ आॅक्टोबर २०१६ ते १४ जानेवारी २०१७ दरम्यान काढण्यात आलेल्या ८४ दिवसांच्या यात्रेत त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सदर यात्रा राजस्थानच्या दुर्गापूर येथून छत्तीसगड, ओडिशा व इतर राज्यात पोहोचली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तसेच बहुजन महिलांच्या विविध समस्या व त्यांच्या जीवनातील वास्तव मांडणारी कवीयित्री म्हणजे गडचिरोली येथील कुसूम अलाम होय. काव्य संग्रहातून त्यांनी महिलांच्या विविध प्रकारच्या वेदना प्रतिबिंबीत केल्या. महिला साहित्यिकांमध्ये त्यांचे नाव विदर्भासह महाराराष्ट्रात आदराने घेतले जाते.‘रान आसवांचे तळे’, ‘रानपाखरांची माय’ या दोन काव्यसंग्रहातून त्यांनी आदिवासी महिलांच्या जीवनाचे वास्तव मांडले. गेल्या ३० वर्षांपासून त्यांचे लेखनकार्य अविरत सुरू आहे. शिवाय विविध वर्तमानपत्रात त्यांचे वैचारिक, प्रासंगिक व समिक्षणात्मक लेख प्रकाशित झाले आहे. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील कवयित्री म्हणून उदयास आलेल्या कुसूम अलाम यांच्या चार कविता मुंबई विद्यापीठाच्या मराठी एम.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग-१ च्या अभ्यासक्रमात तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या बीएसडब्ल्यू भाग-१ च्या अभ्यासक्रमात त्यांच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कवयित्री अलाम यांच्या साहित्यातून आदिवासी महिला बहूजन, शेतकरी व श्रमीक वर्गातील महिलांच्या समस्या अधोरेखित झाल्या आहेत.कुसूम अलाम यांना साहित्यासह समाजकारणात आवड आहे. विविध सामाजिक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी लेखन कार्यासह चर्चासत्र, व्याख्यान व इतर माध्यमातून योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे सन २०१४ मध्ये तत्कालीन राज्यपाल के. शंकर नारायण यांच्या हस्ते पुणे येथे आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय विदर्भ साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलनात त्यांचा सन्मान करण्यात आला. २००८ मध्ये सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. पुणे येथे आदिवासी संस्कृती व मातृसत्ताक पद्धतीवर त्यांनी २०१६ मध्ये व्याख्यान दिले आहे.आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्राय महासचिव अशोक चौधरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या यात्रेत १० राज्याच्या आदिवासीबहुल भागात महिला व बाल अत्याचार तसेच शोषणाविरूद्ध जनजागृतीचे कार्य अलाम यांनी केले. कुसूम अलाम यांनी २००७ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूकही लढविली. यात त्या मौशीखांब-मुरमाडी या जि.प. क्षेत्रातून सदस्य म्हणून निवडून आल्या. २००७ ते २०१२ दरम्यान जि.प.च्या माध्यमातून विविध समस्यांना वाचा फोडली.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस