शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धधम्माच्या दीक्षेबरोबरच प्रत्यक्ष आचरणही महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:35 IST

देशभरातील लाखो नागरिकांनी बौद्धधम्म स्वीकारला आहे. मात्र अनेक कुटुंब बौद्धधम्मानुसार आचरण करीत नसल्याची शोकांतिका आहे. जो धम्म आपण स्वीकारला, त्या धम्माचे आचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या आचारणातून बौद्धधम्माची ओळख समाजाला करून द्या.

ठळक मुद्देभीमराव आंबेडकर यांचे आवाहन : गडचिरोली येथे बौद्धधम्म परिषद व धम्म दीक्षा सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील लाखो नागरिकांनी बौद्धधम्म स्वीकारला आहे. मात्र अनेक कुटुंब बौद्धधम्मानुसार आचरण करीत नसल्याची शोकांतिका आहे. जो धम्म आपण स्वीकारला, त्या धम्माचे आचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या आचारणातून बौद्धधम्माची ओळख समाजाला करून द्या. समाजात बौद्धधम्म रूजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने गडचिरोली येथे बौद्धधम्म परिषद व धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे, जयसेन गवई, अ‍ॅड. एस. एस. वानखेडे, यू. जी. बोराडे, अनिल मेश्राम, भिकाजी कांबळे, देवेंद्र मेश्राम, वामन सरदार, रवी भगत, सेवचंद्र नागदेवते, देवराव मेश्राम, जनार्धन खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे मार्गदर्शन करताना भिमराव आंबेडकर म्हणाले, १२०० वर्षांपूर्वी भारतात बौद्धधम्माचा प्रचार झाला होता. अनेकांनी बौद्धधम्म स्वीकारला होता. मात्र प्रतिक्रांती होऊन काही वर्षातच बौद्धधम्म लुप्त पावला. बौद्धधम्माचे विचार आचरणात न आणल्याने ही बाब घडली आहे. इतिहासाने दिलेला हा धडा प्रत्येक बौद्ध अनुयानाने शिकला पाहिजे. बौद्धधम्म आचरणात आणून तो पुढील पिढीमध्ये रूजविणे आवश्यक आहे. बौद्धधम्माच्या प्रचारात अनेक राजकीय अडथळे आहेत. या अडथळ्यांची शर्यत पार करून बौद्धधम्माचा प्रचार करायचा आहे. यासाठी बौद्ध अनुयांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.कार्यक्रमादरम्यान धम्म दीक्षा सोहळा पार पाडला. ११ उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक प्रा. गौतम डांगे, संचालन तुलाराम राऊत तर आभार अनिल मेश्राम यांनी मानले.