शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई

By admin | Updated: November 25, 2014 22:55 IST

शाळांवर सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांविरूध्द तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी आज मंगळवारी दिले.

अहेरी : शाळांवर सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांविरूध्द तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी आज मंगळवारी दिले. अहेरी पंचायत समितीच्या कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, अहेरी पं.स.च्या सभापती रविना गावडे, उपसभापती सोनाली कंकडालवार, जिल्हा परिषद सदस्य लैजा चालुरकर, पं.स. सदस्य ऋषी पोरतेट, संवर्ग विकास अधिकारी चांदेकर यांच्यासह पं.स.तील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्य, शिक्षण या विभागाची संपूर्ण माहिती अध्यक्षांनी जाणून घेतली. अहेरी भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे किती पद रिक्त आहेत. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची नेमकी परिस्थिती काय आहे. आदीचा आढावा अध्यक्षांनी यावेळी घेतला. ज्या जि.प.च्या शाळांमध्ये शिक्षक नियमितपणे हजर राहत नाही. त्यांच्याविरूध्द तत्काळ कारवाई करा, असे निर्देश त्यांनी पं.स.च्या प्रशासनाला दिले. ग्रामपंचायतस्तरावर सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती ग्रामसेवकांकडून अध्यक्षांनी जाणून घेतली. बीआरजीएफ योजनेच्या कामाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. पंचायत समिती अहेरीतर्फे जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, जि.प. सभापती अजय कंकडालवार यांचा शाल, श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)