शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर होणार कारवाई

By admin | Updated: June 3, 2017 01:09 IST

प्रत्येक बँकेने शेतकऱ्याला कर्ज द्यावे यासाठी बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.

देसाईगंज व चामोर्शीत सभा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; पीक कर्ज वितरणाचा तालुकानिहाय आढावा लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज/चामोर्शी : प्रत्येक बँकेने शेतकऱ्याला कर्ज द्यावे यासाठी बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. तरीही काही बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. कर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी चामोर्शी व देसाईगंज तहसील कार्यालयात बैठक घेऊन कर्जवाटपाचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. देसाईगंज येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची तालुक्यातील सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. २०१७-१८ या वर्षातील नियोजनाबाबत माहिती देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बँक अधिकाऱ्यांनी पॉवर पार्इंट प्रेझेन्टेशनद्वारे लिड बँकेचे मॅनेजर खांडेकर यांच्या मार्गदर्शनात कर्ज वाटपाबाबतची माहिती सादर केली. यावेळी उपविभागीय अधिकारी नान्हे, तहसीलदार सोनवाणे, धाईत, चरडे, नायब तहसीलदार उपेश अंबादे, सहायक गट विकास अधिकारी सुनिता म्हरस्कोल्हे, कृषी अधिकारी कांबळे, भेडे उपस्थित होते. देसाईगंज येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात चामोर्शी व मुलचेरा या दोन तालुक्यातील सर्व बँक व्यवस्थापकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार अरूण येरचे, मुलचेराचे तहसीलदार अनिरूध्द कांबळे, संवर्ग विकास अधिकारी गोविंदा खामकर, मुख्याधिकारी आर्शीया जुही, लिड बँकेचे मॅनेजर आर. एस. खांडेकर, उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी व्ही. एस. राजपूत, मुलचेराचे तालुका कृषी अधिकारी एस. डी. सुतार, कृषी अधिकारी के. बी. दुधे, सहायक व्यवस्थापक आर. एस. गावंडे, प्रबंधक, कैलाश मडावी, अभिषेक देव, बँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक, अंतरीक्ष सिंग, आर. एस. फरकाडे, एस. व्ही. हेडाऊ, ए. एस. ढावल, एन. के. बोरकर, व्ही. एस. हेडाऊ, ए. के. काझी, पी. एम. बोदलकर, पी. एम. धाईत, एस. व्ही. सरपे, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, एस. के. बावणे, तनगुलवार आदी उपस्थित होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही, अशा शेतकऱ्यांची यादी तहसीलदारांनी तयार करून बँकांना उपलब्ध करून द्यावी, पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी तयार करावी, पीक कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना अर्जाकरिता अर्ज करू नये, संपूर्ण कागदपत्रे जोडून अर्जाचा बंच तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अशी केली जाणार जनजागृती तहसीलदार संवर्ग विकास अधिकारी, कृषी अधिकारी महिला बचत गट, कृषी मित्र, महा ई-सेवा केंद्र यांचे पथक तयार करून मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे, लाभार्थ्यांचे संपूर्ण कागदपत्रे भरून घेणे, वनहक्क पट्टेधारकांना पीक कर्ज मंजूर करणे, ग्रामपंचायत स्तरावर पीक कर्जाबाबत बॅनर लावून अधिकाधिक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. प्रत्येक बँकेला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.