शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १२ जणांवर झाली कारवाई

By admin | Updated: March 17, 2017 01:17 IST

नगर परिषदेने उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्याची मोहीम बुधवारपासून हाती घेतली आहे.

उघड्यावर शौचास बसले : गडचिरोली नगर परिषदेची धडक मोहीम सुरू गडचिरोली : नगर परिषदेने उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्याची मोहीम बुधवारपासून हाती घेतली आहे. बुधवारी १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर गुरूवारी आणखी १२ व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत. शहरांमध्ये स्वच्छता राहावी यासाठी शहरातील ज्या नागरिकाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. अशा नागरिकांना शौचालय बांधकामासाठी १६ हजार रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. राज्य शासनाने १ मे पर्यंत गोदरीमुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. अन्यथा संपूर्ण योजनांचे अनुदान रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार गडचिरोली नगर परिषदेने शहर गोदरीमुक्त करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत बुधवारपासून कडक कारवाई करणे सुरू झाले आहे. नगर परिषदेने दोन गुड मॉर्निंग पथके तयार केली आहेत. सदर पथके ज्या भागात उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या भागात सकाळच्या सुमारास पहारा ठेवतात. लोटा धरून बाहेर शौचस जात असलेल्या व्यक्तीला पकडून त्याच्यावर कारवाई केली जात आहे. गुरूवारी विसापूर वार्ड, लांजेडा, इंदिरा नगर व विवेकानंद नगरातील १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर नगर पालिका अधिनियम २३०, २३१, बॉम्बे मुन्सीपल प्रोव्हेन्सीअल अ‍ॅक्ट १९५० सेक्शन १५, ११७ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. गुरूवारच्या गुड मॉर्निंग पथकात मुख्याधिकारी क्रिष्णा निपाने, कनिष्ठ अभियंता मैंद, दुधबळे, अभियंता शेंडे यांच्यासह पोलीस व होमगार्ड यांचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)