शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

चार तालुक्यात खर्ऱ्याविरूद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

मुक्तिपथ तालुका चमूने ठिकठिकाणी नगर पालिका, नगर पंचायत, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथक, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सातत्याने धाडसत्र राबविले जात आहे. गडचिरोली, वडसा, आरमोरी, चामोर्शी अहेरी येथे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरांमध्ये अशा विक्रीला आळा बसला. पण गावांमध्ये अजूनही लपून-छपून खर्रा विक्री होत आहे.

ठळक मुद्देतंबाखूजन्य पदार्थ नष्ट : लपूनछपून सुरू आहे घरपोच खर्राविक्री

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुक्तिपथ तालुका चमूने प्रशासनाच्या सहकार्यातून तंबाखूजन्य पदार्थासह घोटून तयार असलेला खर्रा जप्त केला. कोरची, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडा येथे या कारवाया करण्यात आल्या.मुक्तिपथ तालुका चमूने ठिकठिकाणी नगर पालिका, नगर पंचायत, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथक, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सातत्याने धाडसत्र राबविले जात आहे. गडचिरोली, वडसा, आरमोरी, चामोर्शी अहेरी येथे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरांमध्ये अशा विक्रीला आळा बसला. पण गावांमध्ये अजूनही लपून-छपून खर्रा विक्री होत आहे. अशा गावांमधील दुकाने शोधून काढत सर्व साहित्य मुक्तिपथ व ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे सातत्याने नष्ट केले जात आहे.एटापल्ली तालुक्यातील एकरा बुज या गावी दुकानांमध्ये खर्रा विकला जात होता. गावातील भूमैया आणि पोलीस पाटील यांनी ही माहिती मुक्तिपथ तालुका चमुला दिली. तालुका चमूने या दोघांच्या सहकार्याने येथील चार दुकाने तपासली असता घोटून तयार असलेले एकूण ११० खर्रे सापडले. हा सर्व मुद्देमाल, सोबतच इतरही तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात घेत त्यांची होळी करण्यात आली.कुरखेडा तालुक्यातील तळेगाव, वारवी आणि अंतरगाव येथे खर्राविक्री होत आहे. पानठेले उघडून खर्राविक्री होत असल्याचे निदर्शनास आले. हा खर्रा व इतरही साहित्य असा पाच हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेत नष्ट करण्यात आला.चामोर्शी तालुक्यातील वाघदरा आणि कुरुड येथे पानठेलाधारकांच्या घरी धाड मारली असता खऱ्याचा मोठा साठा सापडला. वाघदारा येथे ३० तर कुरुड येथून ४० खर्रे मुक्तिपथने नष्ट केले. तंबाखूजन्य पदार्थही ताब्यात घेत त्याचीही विल्हेवाट लावली.कोरची तालुक्यातून ४२ खर्रे जप्तकोरची तालुक्यातील पांढरीगोटा येथे चंदनसाय हा इसम घरीच खर्राविक्री करीत असल्याची माहिती मिळाली. मुक्तिपथ कार्यकर्त्यांनी धाड मारली असता घोटून प्लॅस्टिक पन्नीमध्ये बांधून असलेले ४२ खर्रे सापडले. सोबतच खर्रा बनविण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधित तंबाखूदेखील सापडला. हा सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ४० ते ५० रुपयांपर्यंत घरपोच हे खर्रे विकले जात असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीcorona virusकोरोना वायरस बातम्या