शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

गडचिरोलीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 15:33 IST

गडचिरोली पोलीस दलाने आतापर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच एकूण ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर गडचिरोली पोलीस दल कडक कारवाई करत आहे. यासाठी जिल्हाभरात ११ ठिकाणी आंतरजिल्हा चेकपोस्ट तर ४ ठिकाणी आंतरराज्य चेकपोस्टची उभारणी गडचिरोली पोलीस दलाने केली आहे. आतापर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच एकूण ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हाभरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.नागरिकांनी संचारबंदीच्या काळात घरातच थांबून कोविड- १९ रोगाचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले असताना देखील काही बेजबाबदार नागरिक केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांवर गडचिरोली पोलीस दल कडक कारवाई करत आहे. नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले असून यापुढे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस