तीन दिवसांची पोलीस कोठडी : न्यायालयासमोरच केली कारवाईगडचिरोली : दोन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चामोर्शी तालुक्याच्या आष्टी येथे गुरूसाई टेक्निकल एज्युकेशन संस्थेमध्ये २ कोटी ४१ लाख ६२ हजार रूपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याचे उघडकीस आला होता. या प्रकरणात आरोपी असलेला राजेश दोसानी मागील दोन वर्षांपासून पोलिसांना चकमा देत फरार होता. त्याला ३१ जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात त्यावेळी सुरू होता. आताही पाटील यांच्या मार्गदर्शनातच तपास यंत्रणा चालविली जात आहे. राजेश दोसानी हा चंद्रपूर येथून गडचिरोली कोर्टात येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली. त्यानुसार पोलिसांनी कोर्ट चौकात सापळा रचून आरोपीला २.४५ वाजता अटक केली. अटकेनंतर गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ३ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.
शिष्यवृत्ती प्रकरणात आरोपीस अटक
By admin | Updated: February 1, 2017 00:45 IST