शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रामंजापूर फाट्यावर अपघात टाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:02 IST

येथून पाच किमी अंतरावरील राष्ट्रीय महामार्ग ६३ वर रामंजापूर फाट्याजवळ १ एप्रिल रोजी अपघात होऊन यामध्ये एक जण जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देगतिरोधक उभारले : राष्ट्रीय महामार्ग ६३ वरील अपघातप्रवण स्थळ

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : येथून पाच किमी अंतरावरील राष्ट्रीय महामार्ग ६३ वर रामंजापूर फाट्याजवळ १ एप्रिल रोजी अपघात होऊन यामध्ये एक जण जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची दखल घेत बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.सिरोंचा-अंकिसा मार्गावरील रामंजापूर फाट्याजवळचा परिसर अपघात प्रवनस्थळ मानला जातो. या फाट्यावर नेहमीच अपघात घडतात. विशेष म्हणजे समोर वळण आहे. त्यामुळे दूरवरून येणारे वाहन नजरेस पडत नाही. त्यामुळे या ठिकाणी वर्षातून अनेकदा अपघात होतात. १ एप्रिल रोजी झालेला अपघात अतिशय भयंकर होता. या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी व पुतण्या गंभीर जखमी झाले. दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या ठिकाणी गतिरोधक नसल्याने मुख्य मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांची गती कमी होत नाही. त्याचबरोबर फाट्याकडून मार्गाकडे येणाऱ्या व्यक्तीचेही लक्ष राहत नाही. परिणामी या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले होते. १ एप्रिलच्या अपघातानंतर या ठिकाणी गतिरोधक बांधण्याची मागणी नागरिकांकडून होण्यास सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या मागणीची दखल घेत या ठिकाणी गतिरोधक बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. वाहनांच्या गतीवर नियंत्रण मिळून अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.