शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडातील शैक्षणिक सुधारणेचे स्वीकारले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 01:20 IST

जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी गळतीचे प्रमाण आणि उपस्थितीचे प्रमाण कमी असलेल्या आदिवासीबहुल,

अश्विनी सोनावने रूजू : पुण्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे धाडस लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी गळतीचे प्रमाण आणि उपस्थितीचे प्रमाण कमी असलेल्या आदिवासीबहुल, नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील अशा भामरागड तालुक्यातील शैक्षणिक व्यवस्था सुधारण्याचे आव्हान स्वीकारून पुणे येथील गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावने यांनी भामरागड तालुक्यात स्वत:ची नियुक्ती मागितली आहे. शुक्रवारी त्यांनी पदभारही स्वीकारला आहे. त्यांचा हा आव्हानात्मक निर्णय जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. आदिवासीबहुल, मागास व नक्षलग्रस्त अशी गडचिरोली जिल्ह्याची राज्यभरात ओळख आहे. त्यामुळे पुणे, मुंबई येथील अधिकारी जिल्ह्यात येण्यास तयार होत नाही. एखाद्याची बदली झाली तरी रूजू होऊन वैद्यकीय रजा घेतात व रजेच्या कालावधीत बदली रद्द करण्याचे प्रयत्न चालवितात हा आजपर्यंतचा येथील नागरिकांचा अनुभव आहे. मात्र पुणे येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असलेल्या अश्विनी सोनावने यांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे भामरागड तालुक्यात स्वत:ची नियुक्ती मागितली. नियुक्ती मागितल्यानंतर त्या रूजू होणार की नाही, असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र सोनावने यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला आहे. तत्पूर्वी त्यांनी शिक्षणाधिकारी एम.एन. चलाख यांच्यासोबत चर्चा केली. अश्विनी सोनावने यांच्या या धाडसी निर्णयाचे शिक्षणमंत्र्यांनीसुद्धा स्वागत केले आहे. त्यांचा हा निर्णय इतर अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.