शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजला ६९६ कोटींची सुधारित मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. १० हजार १९९ हेक्टर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम निधीअभावी आणि सुधारित मान्यतेअभावी अडले होते. ते आता मार्गी लागले आहे. वैनगंगा नदीच्या डाºया तिरावर कोटगलजवळ असलेल्या कोटगल उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

ठळक मुद्देपुढील वर्षापर्यंत शेतीला पाणी : कोटगल, हल्दीपुरानी, कोसरी योजना अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मोठ्या नद्यांचे वरदान लाभूनही वनकायद्यामुळे मोठ्या प्रकल्पांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता उपसा सिंचन योजनांमुळे दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काही योजना आता अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी त्यातील पाणी शेतकऱ्यांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजला ६९६ कोटींची सुधारित मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. १० हजार १९९ हेक्टर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम निधीअभावी आणि सुधारित मान्यतेअभावी अडले होते. ते आता मार्गी लागले आहे. वैनगंगा नदीच्या डाऱ्यां तिरावर कोटगलजवळ असलेल्या कोटगल उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ९ गावांमधील ३ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन करणाऱ्या या उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. शिर्ष कामे जून २०२० पर्यंत पूर्ण होणार असून वितरण प्रणालीची कामे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हल्दीपुरानी उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याची प्रतिक्षा आहे. ती मिळताच या योजनेच्या कामाला गती येणार आहे. सध्या पंपगृहाचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले असून उर्ध्वनलिकेचे काम ९० टक्के झाले आहे. जून २०२० पर्यंत शिर्ष कामे तर वितरण प्रणालीचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होऊ शकते.कोसरी प्रकल्पाचे धरण काम पूर्ण झाले आहे. वितरण प्रणालीचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.वेळेत निधी मिळण्यासाठी प्रयत्न गरजेचेजिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांसाठी वेळोवेळी निधी मिळण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. निधीअभावी कामे अर्धवट होऊन प्रकल्पांची किंमत वाढते. पण ज्या प्रकल्पांचे काम ७० टक्केपेक्षा जास्त झाले आहे त्यांना प्राधान्याने निधी दिल्यास प्रकल्प लवकर पूर्ण होऊन शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळू शकेल. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प