शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जिल्ह्यात धान रोवणीच्या कामास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:08 IST

जुलै महिन्यात १५ ते २० दिवसात पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागासह जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे.

ठळक मुद्देजलसाठ्यात वाढ : पावसाच्या पुनरागमनाने जिल्हाभरातील शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जुलै महिन्यात १५ ते २० दिवसात पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागासह जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे. या पावसाने धान पिकाच्या रोवणीस वेग आला आहे.भरपूर पावसाचे समजले जाणारे आर्द्रा व पुनर्वसू हे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने शेतजमिनील धान पºहे करपण्यास सुरूवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम खोळंबले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना २५ जूनपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. रविवारीही रात्रीपासून दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या आदी जलसाठ्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यात पाणी वाढल्यामुळे याचा फायदा खरीप हंगामातील धान पिकाला होणार आहे. शेतकरी मध्यंतरीच्या काळात पावसाच्या प्रचंड प्रतीक्षेत होता. दरम्यान अनेक गावांमध्ये पूजा-अर्चा करून वरूण राजाला पाऊस पडण्यासाठी साकडेही घालण्यात येत होते. मात्र पाऊस बरसत नव्हता. अखेर २५ जून पासून पाऊस सुरू झाला. तो पाऊस अद्यापही कायम आहे.दमदार व संततधार पाऊस होत असल्यामुळे शेतजमिनीत रोवणी योग्य पाणी साचले आहे. ज्या शेतकºयांनी यापूर्वीच धान पिकाचे पºहे टाकले, त्यांचे पऱ्हे सुध्दा रोवणी योग्य झाले आहे. जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज, गडचिरोली तालुक्यासह अनेक ठिकाणच्या शेतकºयांनी आपल्या शेतातील धान रोवणीच्या कामास प्रारंभ केला आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतीची कामे करण्यास मजूर मिळत नाही. मजुराची टंचाई भासते. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठे शेतकरी बाहेरगावावरून स्वत:च्या ट्रॅक्टरने महिला व पुरूष मजूर गावात आणून रोवणीच्या कामास वेग दिला आहे. ज्या गावात बहुतांश लोकांकडे शेतजमीन आहे, असे लोक स्वत:च्या शेतातील रोवणी आटोपल्याशिवाय दुसºयाच्या रोवणीच्या कामास मजूर म्हणून जात नाही. त्यामुळे बाहेरगावच्या मजुराचा आधार घेतला जात आहे. एकूणच सर्वत्र धानपिक रोवणीची लगबग सुरू झाली आहे.ट्रॅक्टरचे भाडे वाढलेधानपीक रोवणीसाठी चिखलणी करणे आवश्यक असते. यासाठी लाकडी नांगराचे दिवसभराचे भाडे ४०० रुपये घेतले जातात. तर ट्रॅक्टर चिखलणीसाठी वापरल्यास ७०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहे. ट्रॅक्टर मालकांना आता रोवणीच्या निमित्ताने सुगीचे दिवस आले आहे. झटपट रोवणी उरकण्यासाठी अनेक शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. दोन वर्षात ट्रॅक्टरचे भाडे वाढले.

टॅग्स :agricultureशेती