शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

काेराेना लसीकरणाची गती वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 05:00 IST

कोविडच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उशिरा कोविड संक्रमण वाढत आहे. त्यामुळे लोक संसर्गाबाबत अनभिज्ञ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीचा पहिला डोस उर्वरित नागरिकांना देण्याबरोबर पात्र लोकांना दुसरा डोसही द्यावा. कोरोनाची चाचणी करताना आरटीपीसीआरची टक्केवारी वाढवावी.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे यांनी कोविडबाबत आढावा घेताना जिल्ह्यात लसीकरण वाढविण्याबरोबरच आरटीपीसीआर कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. कोविडच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उशिरा कोविड संक्रमण वाढत आहे. त्यामुळे लोक संसर्गाबाबत अनभिज्ञ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीचा पहिला डोस उर्वरित नागरिकांना देण्याबरोबर पात्र लोकांना दुसरा डोसही द्यावा. कोरोनाची चाचणी करताना आरटीपीसीआरची टक्केवारी वाढवावी. संसर्ग झालेल्यांची खात्री योग्य प्रकारे होईल व त्यांच्या संपर्कातील इतरांचाही शोध नेमक्या स्वरुपात घेता येईल.त्याचबरोबर बेड्सची उपलब्धता, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन प्लांट सद्यस्थितीत सुरु असल्याची खात्री करून  त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध होईल, याची दक्षता घेण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली. ऑक्सिजन प्लांट यापुढे अखंड सुरु राहण्यासाठी मनुष्यबळ निर्मितीबरोबर कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तरुणांची निवड करता येईल, यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही दिल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संजय जठार व आरोग्य विभागातील इतर अधिकारी हजर होते. 

स्वीप कार्यक्रमाची गती वाढवा-    मतदार जनजागृतीकरिता राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांची गती वाढविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे - वर्मा यांनी बैठकीत दिल्या. नवमतदार नोंदणी मतदान ओळखपत्र दुरुस्ती प्रक्रिया, मतदानाचे महत्व अशा बाबी राबविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात यावेत. तसेच दुर्गम भागातही स्थानिक प्रशासनाला स्वीप बाबत कार्यक्रम घेण्याचे निर्देश द्यावेत असे लवांगरे यावेळी म्हणाल्या.

लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करा-    एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या मोहिमा राबवून त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून जनजागृती करावी, अशा सूचना प्राजक्ता लवांगरे यांनी बैठकीत दिल्या. गावस्तरावरील आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी तसेच ग्रामसेवकाची मदत घेतली जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

३०० चमूंची विशेष लसीकरण माेहीम -    पुढील आठवड्यापासून ३०० चमूंची विशेष लसीकरणाची मोहीम सुरु करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच आता घरोघरी लसीकरण करुन गडचिरोली जिल्ह्यात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

प्रलंबित दावे व हरकती तातडीने निकाली काढा

मतदार यादी ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम स्वरुपात प्रसिद्ध करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून आलेल्या असल्यामुळे त्यामधील प्रलंबित दावे व हरकती तातडीने निकाली काढाव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी दिल्या. जिल्ह्यात विधानसभा मतदार संघातून ९३५ मतदान केंद्र आहेत. यात एकूण मतदार ७९०५०२ मतदार असून महिला ३९०३८६ , पुरुष ४००११३ तर तृतीयपंथी ३ नव्याने मतदार नोंदणीसाठी व दुरुस्तीसाठी १८०९५ अर्ज दाखल झाले आहेत. त्याकरिता २१ बीएलओची नियुक्ती करुन १६७२५ अर्ज स्वीकारले त्यातील १३२३ नाकारलेले आहेत. ४१ अर्जावरील तपासणी शिल्लक आहे. मतदार यादी शंभर टक्के योग्य होण्यासाठी सर्व दावे हरकती वेळेत सोडवून मतदारांना त्याची माहिती मिळणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcollectorजिल्हाधिकारी