शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींच्या भेटीत १० कर्मचारी अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:32 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता सिरोंचा पंचायत समितीला आकस्मिक भेट दिली असता, भेटीदरम्यान ३२ पैकी १० कर्मचारी अनुपस्थित होते.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : सिरोंचा पं.स.ला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता सिरोंचा पंचायत समितीला आकस्मिक भेट दिली असता, भेटीदरम्यान ३२ पैकी १० कर्मचारी अनुपस्थित होते.पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी जनगाम यांना प्राप्त झाल्या होत्या. याची शहानिशा करण्यासाठी जनगाम यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता पंचायत समिती कार्यालयाला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान पंचायत समितीमधील एकूण ३२ कर्मचाऱ्यांपैकी १० अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. काही विस्तार अधिकाऱ्यांनी हलचल रजिस्टरवर दौºयावर जात असल्याची नोंद केली. प्रत्यक्षात मात्र ते दौºयावर गेले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दुसरा शनिवार व रविवारच्या सुटीच्या वेळी कर्मचारी शनिवारी दुपारीच कार्यालय सोडतात. सोमवारी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचतात. अनुपस्थितीत असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले जाईल, अशी माहिती जनगाम यांनी दिली आहे. येथील बीडीओचा प्रभार पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे पदभार आहे. याचा गैरफायदा कर्मचाऱ्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे, असा आरोप जनगाम यांनी केला आहे.अनुपस्थितांची नावेकनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.एन. मेश्राम, पंचायत विस्तार अधिकारी जी. बी. माकडे, कृषी विस्तार अधिकारी जी. टी. पोरटे, आरोग्य विस्तार अधिकारी एम.बी. कुंभारे, आरोग्य पर्यवेक्षक व्ही.व्ही. कोत्तावार, अभियांत्रिकी सहायक पी.एल. नागरगोजे, कनिष्ठ सहायक जी. टी. वासनिक, एन. एम. कत्रोजवार, एन. एस. किरणापुरे हे अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित आढळले.