शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने पं. स. ची आढावा बैठक रद्द

By admin | Updated: April 21, 2017 01:13 IST

गडचिरोली पंचायत समितीमार्फत विविध शासकीय योजनांची सुरू असलेली अंमलबजावणी तसेच पं. स. अंतर्गत

पूर्व सूचना दिली होती : खासदार, आमदारांनी व्यक्त केली नाराजीगडचिरोली : गडचिरोली पंचायत समितीमार्फत विविध शासकीय योजनांची सुरू असलेली अंमलबजावणी तसेच पं. स. अंतर्गत झालेल्या व सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी खा. अशोक नेते यांनी गुरूवारी गडचिरोली पंचायत समितीची आढावा बैठक बोलाविली होती. मात्र या बैठकीला अनेक अधिकारी अनुपस्थित होते. तर बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी स्वत: बैठकीला उपस्थित न राहता आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना प्रतिनिधी म्हणून पाठविले. बैठकीला अधिकारी उपस्थित न झाल्याने खासदार अशोक नेते यांनी पंचायत समितीची ही आढावा बैठक रद्द केली, अशी माहिती पं. स. चे उपसभापती विलास दशमुखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ग्राम पंचायतस्तरावर होणाऱ्या विकास कामांवर तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर पं. स. प्रशासनाचे नियंत्रण असते. ग्रामीण भागाचा विकास करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर आहे. त्यामुळे खासदार, आमदार पंचायत समितीची आढावा बैठक दरवर्षी घेतात. पं. स. स्तरावरून रखडलेल्या विकास कामांना तसेच विविध समस्या मार्गी लावण्याचे काम लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने अशा बैठकीतून होत असते. मात्र आजच्या आढावा बैठकीला बरेचसे अधिकारी अनुपस्थित असल्याने खासदार, आमदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. यावेळी आ. डॉ. देवराव होळी, पं. स. सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, तहसीलदार संतोष खांडरे, बीडीओ यू. डी. पचारे, जि. प. सदस्य मीना कोडाप, भाजपचे पदाधिकारी रवींद्र ओल्लालवार, रेखा डोळस तसेच पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)अधिकाऱ्यांची निष्क्रियता खपवून घेणार नाहीलेखी पूर्व सूचना देऊन पंचायत समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र अनेक अधिकारी या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे सभा रद्द करावी लागली. विकास कामे व विविध शासकीय योजनेच्या अंमलबजावणीत अधिकाऱ्यांची निष्क्रियता आपण खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद खा. अशोक नेते यांनी यावेळी बोलताना दिली.गडचिरोली पं. स. तील सभागृहाच्या अद्यावतीकरणासाठी खासदार फंडातून निधी देण्यास खा. अशोक नेते यांनी सकारात्मकता दाखविली आहे. त्यामुळे पं. स. सभागृहात साऊंडसिस्टीम व इतर सुविधा होणार आहे, अशी माहिती पं. स. चे उपसभापती विलास दशमुखे यांनी दिली आहे.