शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्ड लिंकिंगचे काम २७ टक्क्यांवर

By admin | Updated: August 23, 2015 01:45 IST

अन्नधान्य पुरवठ्यातील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात राशनकार्डाला आधारकार्ड क्रमांक जोडून आॅनलाईन नोंदणीची मोहीम सुरू केली आहे.

राशनकार्डाशी संलग्नित : २ लाख २४ हजार कार्डाची झाली आॅनलाईन एन्ट्रीगडचिरोली : अन्नधान्य पुरवठ्यातील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात राशनकार्डाला आधारकार्ड क्रमांक जोडून आॅनलाईन नोंदणीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात राशनकार्डाला आधारकार्ड लिंकिंग करण्याचे काम २७ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण २ लाख १० हजार राशनकार्डधारक आहेत. राशनकार्डावर नावाचा समावेश असलेल्या २ लाख २४ हजार ५२६ सदस्यांची आधारकार्ड लिंकिंग झाली आहे. राशनकार्डावर नावाचा समावेश असलेल्या जिल्ह्यातील ८ लाख ४६ हजार ४१६ सदस्यांनी अर्ज भरून नोंदणी केली आहे. संपूर्ण राज्यभरात आॅनलाईन राशनकार्ड नोंदणीची मोहीम सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात इंटरनेट कनेक्टिव्हीटी अभावाच्या समस्येमुळे राशनकार्ड आॅनलाईन नोंदणीचे काम थंडावले होते. विशेष म्हणजे मोहीम सुरू झाल्यानंतर भामरागड, एटापल्ली आदींसह दुर्गम तालुक्यात आॅनलाईन नोंदणीचे काम ठप्प होते. त्यानंतर राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून गडचिरोली जिल्ह्यात राशनकार्ड आॅनलाईन नोंदणीची गती वाढविण्यात आली. राज्य सरकारतर्फे सर्व शासकीय कार्यालयात पेपरलेस वर्कचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या संगणकीकरणाच्या कामात काही प्रमाणात गती आली आहे. शिधापत्रिकांची सर्व माहिमी आॅनलाईन झाल्यानंतर योजना राबविताना सोयीस्कर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आॅनलाईन नोंदणी मोहिमेमुळे बोगस राशनकार्डधारकांवर आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राशनकार्डातील सर्व सदस्यांची माहिती आॅनलाईन झाल्यानंतर कार्डधारकांच्या कुटुंबातील सदस्यांचे स्टेटस् कळणार आहे. बोगस बीपीएल कार्डधारकांची अचूक माहिती पुढे येणार आहे. पुरवठा विभाग व अन्नधान्य वितरण प्रणालीत सुसूत्रता ेयेण्यासाठी आॅनलाईन नोंदणी मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)चार परवाने निलंबित, १० परवाने रद्दतहसील कार्यालय व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकान व केरोसीन दुकानाची तपासणी केली जाते. याशिवाय प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित धान्य व केरोसीन दुकानाची तपासणी केली जाते. जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यांच्या कालावधीत पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुकानाची तपासणी करून केरोसीन दुकानाचे तीन परवाने निलंबित केले व दोन परवाने रद्द केले. तसेच ४७ हजार रूपयांचा दंड वसूल केला. स्वस्त धान्य दुकानाचे आठ परवाने रद्द तर एक परवाना निलंबित करून संबंधित दुकानदाराकडून २० हजारांचा दड वसूल केला.