शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

९९७ झाडांची होणार कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:57 IST

मूल ते गडचिरोलीपर्यंत ९३० क्रमांकाच्या राष्टÑीय महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली आहे. वैनगंगा नदी ते इंदिरानगरपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९९७ झाडे रस्त्यावर असल्याने....

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग : वन विभागामार्फत सर्वेक्षण, वैनगंगा नदीपासून कामाला सुरुवात

दिगांबर जवादे।ऑनलाईन लोकमतगडचिरोली : मूल ते गडचिरोलीपर्यंत ९३० क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली आहे. वैनगंगा नदी ते इंदिरानगरपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९९७ झाडे रस्त्यावर असल्याने ही झाडे तोडली जाणार आहेत. या संदर्भातील कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे.गडचिरोली-चंद्रपूर या राज्य महामार्गाला मागील वर्षी केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. चंद्रपूर ते गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव-छत्तीसगड राज्याची सीमेपर्यंत एकच राष्ट्रीयय महामार्ग आहे. एवढे काम एकाच कंत्राटदाराला व एकाचवेळी करणे शक्य नसल्याने या कामाचे तुकडे पाडण्यात आले आहेत. त्यापैकी मूल ते गडचिरोलीपर्यंतचा एक तुकडा असून या कामाला सुरूवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाडजवळून कामाला सुरूवात झाली होती. दोन महिन्यात सदर काम गडचिरोली जिल्ह्यातील पुलखलपर्यंत आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीजवळील चकपीरंजी गावापर्यंत काम पोहोचले आहे. या मार्गाचे रूंदीकरण केले जात आहे. मार्गाच्या बाजुला असलेली झाडे कापावी लागणार आहे. यासाठी वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान ९९७ झाडे रस्त्यात सापडत असल्याने सदर झाडे तोडली जाणार आहेत. नगर परिषद क्षेत्रात झाडे तोडण्याबाबत परवानगी देण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे. तर ग्रामपंचायत क्षेत्रातील झाडे ग्रामपंचायतीच्या परवानगीनंतर तोडली जाणार आहेत. इतर झाडांना वन विभाग परवानगी देणार आहे. त्याबाबतची कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे.या प्रजातीची झाडे तोडणारवैनगंगा नदी ते गडचिरोली शहरातील इंदिरानगरातील वन विभागाच्या नाक्यापर्यंत एकूण ९९७ झाडे तोडली जाणार आहेत. यामध्ये किन्हीची १७ झाडे, पेंटाफार्मची २३८ झाडे, करंजी १३७, मोहा १२, पा.सिरस २८, सिरस १०६, चिंच ६, साग ३९, कॅशीया ५०, निलगिरी १०, बोर ११, बाभूळ ४१, निम २४, हिवर २१०, वड ४ व आंबा, कवट, काटेसावरची प्रत्येकी दोन आदी झाडे तोडली जाणार आहेत.कार्यवाही सुरूझाडे तोडण्याची कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे. सर्वेक्षणानंतर आता जाहीनामा काढला जाणार आहे. त्यामध्ये एखाद्या खासगी व्यक्तीचे झाड असल्यास त्यावर आक्षेप मागितले जाणार आहेत. आक्षेप स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या परवानगीनंतर झाडे तोडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तोडलेल्या झाडांची किंमत ठरविली जाणार आहे. सदर किंमत राष्ट्रीय महामार्ग विभाग संबंधित यंत्रणांना देणार आहे.