शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

९४ टक्के रेशन कार्डांना ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:08 IST

रेशन कार्डधारक स्वस्त धान्याच्या वाटपात होणारी अफरातफर बंद करून योग्य उत्पन्न गटातील व्यक्तीला त्याचे हक्काचे रेशन मिळण्यासाठी सर्व कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात आहे.

ठळक मुद्दे१० हजार कार्ड बाकी : बिनाआधार रेशन कार्ड ठरणार अपात्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेशन कार्डधारक स्वस्त धान्याच्या वाटपात होणारी अफरातफर बंद करून योग्य उत्पन्न गटातील व्यक्तीला त्याचे हक्काचे रेशन मिळण्यासाठी सर्व कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात आहे. जिल्ह्यात हे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही १० हजार ८९८ कार्डधारकांनी आधार लिंक केलेले नाही. त्यांनी याबाबत उदासीनता दाखविल्यास भविष्यात त्यांचे रेशन कार्ड स्वस्त धान्य मिळण्यासाठी अपात्र ठरणार आहे.महागाईच्या या जमान्यात रेशन दुकानातून सरकारी अनुदानावर मिळणारे स्वस्त धान्य, साखर, तेल, रॉकेल अशा दैनंदिन जीवनमानातील काही आवश्यक वस्तू गोरगरीब कुटुंबांना बºयाच प्रमाणात दिलासा देतात. मात्र बहुतांश लोक तहसील कार्यालयातील संबंधित यंत्रणेला हाताशी धरून रेशन कार्डवर कमी उत्पन्न दाखवत स्वस्त धान्याचा लाभ घेतात. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेकांच्या नावे रेशन कार्ड बनविण्यात आले आहेत. परंतू रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केल्यामुळे कोणत्या कुटुंबात किती सदस्य आहेत हे समजण्यासोबतच कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न व इतर बाबीही दिसून येतात. त्यामुळे या यंत्रणेतील भ्रष्ट कारभारावर नियंत्रण येण्यासाठी सरकारने प्रत्येक रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणी अत्यावश्यक केले.जिल्ह्यात अंत्योदय रेशन कार्डधारक ९२ हजार ७९८ आहेत. त्यापैकी ८६ हजार ८२ जणांचे कार्ड आधारशी जोडल्या गेले. प्राधान्य कुटुंबातील ५१ हजार ९७६ पैकी ४९ हजार ८९३ हजार कार्ड आधारशी जोडले आहेत. तर ३८ हजार ४६ साध्या रेशन कार्डपैकी ३५ हजार ९४७ कार्ड आधारशी लिंक करण्यात आले आहेत. एकूण १ लाख ८२ हजार ८२० रेशन कार्डपैकी १ लाख ७१ हजार ९२२ कार्ड आधारशी जोडण्यात आलेत. रेशन कार्ड आधार लिंक करण्यात गडचिरोली तालुक्याने आघाडी घेतली आहे. २३ हजार २५२ पैकी केवळ ९६ कार्ड आधार लिंक करणे बाकी आहे. त्याखालोखाल देसाईगंज, चामोर्शी, कुरखेडा हे तालुकेही आघाडीवर आहेत.