शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

९० हजारांची मोहफुलाची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

तालुक्यातील नडीकुडा या गावात मोठ्या प्रमाणात गुळाची व साखरेची दारू गाळून संपूर्ण सिरोंचा तालुक्यात त्याची तस्करी होते. गावातील बहुतेक घरी हातभट्ट्या आहेत. पेंटिपाका माल, पेंटिपाका चक आणि तुमनूर टोला ही गावे याच मार्गावर असल्याने या गावातही दारूची तस्करी होते. लॉकडाऊन असल्याने रात्रीला दारूची तस्करी वाढली आहे.

ठळक मुद्देदोन दुचाकी ताब्यात : पेंटिपाका माल, चक व तुमनूर टोला येथील गावकऱ्यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : ट्रॅक्टरच्या ट्यूबमध्ये तसेच प्लॅस्टिक पन्नीमध्ये दारू भरून त्याची दुचाकीवरून रात्रीला तस्करी करीत असलेल्यांचा मुद्देमाल पेंटिपाका माल, पेंटिपाका चक आणि तुमनूर टोला येथील पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी पकडून नष्ट केला. यावेळी विक्रेते फरार झाले. दोन दुचाकीही गावकऱ्यांनी ताब्यात घेतल्या. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. नडीकुडा या गावातून या दारूची तस्करी केली जात होती.तालुक्यातील नडीकुडा या गावात मोठ्या प्रमाणात गुळाची व साखरेची दारू गाळून संपूर्ण सिरोंचा तालुक्यात त्याची तस्करी होते. गावातील बहुतेक घरी हातभट्ट्या आहेत. पेंटिपाका माल, पेंटिपाका चक आणि तुमनूर टोला ही गावे याच मार्गावर असल्याने या गावातही दारूची तस्करी होते. लॉकडाऊन असल्याने रात्रीला दारूची तस्करी वाढली आहे. रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती या तीन गावातील लोकांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस पाटलांना दिली.तुमनूरचे पोलीस पाटील सुंकरी राजमल्लू, पेंटिपाका चेक चेकचे पोलीस पाटील सडवाली वेमुला, पेंटिपाका मालचे पोलीस पाटील सत्यनारायण नरहरी, सत्यम गोरा, सीनू सिरंगी, मनिष वेमुला, मणिकठा वेमुला, विशाल मच्चिडी, प्रणय मडे, किरण वेमुला, व्यंकटस्वामी सिरंगी आदी गावकºयांनी दारूची वाहतूक करणाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. मध्यरात्री गावकरी गावाजवळ दबा धरून बसले. दुचाकीने काही जण दारू घेऊन येत असल्याचे लक्षात येताच सर्वांनी त्यांचा पाठलाग केला. ही बाब लक्षात येताच दोघांनी दारू व दुचाकी टाकून अंधारात पळ काढला तर एक जण दारू टाकून गाडीनेच पसार झाला. ट्रॅक्टरच्या ट्यूबमध्ये व प्लॅस्टिक पन्नीमध्ये भरलेली तब्बल ३५० लीटर दारू तीनही गावकºयांनी जप्त केली. ही दारू ९० हजार रुपयाची असल्याचे सांगण्यात आले.पहाटे पोलीस पाटलांनी ही माहिती मुक्तिपथ तालुका चमूला दिली. मुक्तिपथ तालुका चमूने सिरोंचा पोलिसांना याची माहिती देत घटनास्थळ गाठले. पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे आणि मेजर मडावी यांनी सहकाºयांना घेऊन घटस्थळी धाव घेत गावकºयांचे कौतुक केले व सर्व मुद्देमाल नष्ट केला व दुचाकी ताब्यात घेतल्या.पोटगाव व विसोरातही कारवाईदेसाईगंज : पोटगाव आणि विसोरा येथील हातभट्टीचालकांचा तब्बल १५ क्विंटल मोहसडवा पोलीस पाटील आणि मुक्तिपथ गावसंघटनांनी पकडून नष्ट केला. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. पोटगाव येथे एक महिला घरीच दारू गाळून त्याची विक्री करीत असल्याची माहिती गाव संघटनेला मिळाली. त्यांनी मुक्तिपथ चमुला याची माहिती दिली. गाव संघटनेच्या महिला, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच यांच्या मदतीने धाड टाकली असता घरी दारू विकली जात असल्याने निदर्शनास आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावातील युवकही गस्तीवर आहेत. हा प्रकार लक्षात येताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत सर्वांनी मिळून परिसर पिंजून काढला असता चुंगड्ड्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ५०० किलो मोहसडवा सापडला. त्याचबरोबर दारू काढण्याचे साहित्यही सापडले. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेत तो नष्ट केला. देसाईगंजमधील काही लोक विसोरा येथे दारू पिण्यासाठी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. युवकांनी त्यांचा पाठलाग करीत एका विक्रेत्याच्या घरी मुक्तिपथ गाव संघटनेचे कार्यकर्ते आणि तालुका चमू यांच्या सहकार्याने धाड टाकली असता तब्बल १० क्विंटल मोहसडवा सापडला.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा