शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

९८ बसगाड्या राहणार मार्कंडा यात्रा स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:13 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी प्रवासाकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागातर्फे बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिवभक्तांच्या सेवेसाठी महामंडळ सज्ज : ११ ते १५ फेब्रुवारीदरम्यानचे बसगाड्यांचे वेळापत्रक निश्चित

संतोष सुरपाम/लोमेश बुरांडे।लोकमत न्यूज नेटवर्कमार्र्कंडादेव/चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी प्रवासाकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागातर्फे बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तब्बल ९८ बसेस शिवभक्तांच्या सेवेसाठी सोडण्यात येणार आहे.चंद्रपूर बस आगारातर्फे २०, ब्रह्मपुरी आगारातर्फे २४, गडचिरोली आगारातर्फे ३५ व अहेरी आगारातर्फे १९ अशा एकूण ९८ बसगाड्या मार्कंडा यात्रा स्पेशल म्हणून सोडण्यात येणार आहे. चंद्रपूर येथून मार्कंडासाठी २० बसेस सोडण्यात येणार असून यामध्ये १० विनावाहक व १० वाहकासह बसगाड्या सोडण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी आगारातर्फे मूल-मार्कंडादेव अशा २२ बसगाड्या सोडण्यात येणार असून यामध्ये ८ विनावाहक बसगाड्यांचा समावेश आहे. गडचिरोली आगारातर्फे गडचिरोली ते मार्र्कंडा अशा १८ बसगाड्या चामोर्शी ते मार्कंडा अशा १०, सावली ते साखरी घाट तीन, व्याहाड खुर्द ते साखरी घाट दोन व व्याहाड बुज ते साखरी घाट दोन अशा ३५ बसगाड्या सोडण्यात येणार आहे.अहेरी आगारातर्फे कालेश्वर, आष्टी, चपराळा, मार्कंडादेव, व्यंकटापूर व नगरम आदी तिर्थस्थळांच्या यात्रांसाठी १९ बसगाड्या सोडण्यात येणार आहे. यामध्ये आष्टी-मार्कंडा-चपराळा अशा १५, सिरोंचा-नगरम-कालेश्वर अशा दोन व अहेरी येथून व्यंकटपूरसाठी दोन अशा १९ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव येथे भरणाऱ्या यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारातर्फे बसगाड्यांसह मनुष्यबळ व नियंत्रण केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. गडचिरोली, चामोर्शी, व्याहाड खुर्द, व्याहाड बुज, सावली व अरततोंडी येथे प्रत्येकी एक नियंत्रण केंद्र राहणार असून १३ नियंत्रण कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. गडचिरोली आगारातर्फे या केंद्राच्या नियंत्रणात ३६ बसगाड्या यात्रा स्पेशल म्हणून सोडण्यात येणार आहे.महाशिवरात्री यात्रेदरम्यानच्या बस प्रवाशी वाहतुकीची जबाबदारी एसटीचे विभाग नियंत्रक ए.टी.गव्हाळे यांच्या मार्गदर्शनात विभागीय वाहतूक अधिकारी एन.एस.बेलसरे, आगार व्यवस्थापक व्ही.एल.बावणे यांच्या नियंत्रणात गडचिरोलीचे बसस्थानक प्रमुख पी.एस.सालोटकर, चामोर्शी बसस्थानक प्रमुख एस.ए.चौधरी सांभाळणार आहेत. यात्रेदरम्यान महामंडळातर्फे चालक-वाहकाच्या सुट्या रद्द करण्यात येणार आहे.ेमार्कंडादेव व साखरी घाटावर तात्पुरते बसस्थानकगडचिरोली आगारातर्फे ३६ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मार्कंडादेव यात्रेसाठी या बसेस भाविकांकरिता ब्रह्मपुरी, चंद्रपूर, राजुरा, वरोरा, अहेरी, चिमूर आगारातर्फे बसगाड्या सोडण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान मार्कंडादेव व साखरी घाटावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येणार आहे. या बसस्थानकात नियंत्रण कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. सदर दोन्ही ठिकाणच्या तात्पुरत्या बसस्थानकावर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच बसगाड्यांसाठी आवश्यक इंधनसाठा, यांत्रिकी, स्वच्छक आदी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. येथे पेंडालची व्यवस्था राहणार असून लाऊडस्पीकरद्वारे बसफेऱ्यांचे आवाहन करण्यात येणार आहे. प्रवाशी उपलब्धतेनुसार सदर यात्रेसाठी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याची तजवीज करण्यात येणार आहे.गडचिरोली, चामोर्शीतही राहणार पेंडालची व्यवस्थागडचिरोली येथे चामोर्शी मार्गावर पेंडालची व्यवस्था करण्यात येणार असून येथेही तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येणार आहे. तसेच चामोर्शी बसस्थानकालगत भाविकांसाठी पेंडालची व्यवस्था राहणार आहे.