शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

९७ कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: September 3, 2014 23:23 IST

राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ९७.४७ कोटी रूपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टापैकी ८८ टक्के कर्जाचे वाटप

उद्दिष्टाच्या ८८ टक्के : राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटपात पिछाडीवरचगडचिरोली : राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ९७.४७ कोटी रूपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टापैकी ८८ टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. महत्वाचे म्हणजे मागील वर्षीसुद्धा १६ आॅगस्टपर्यंत उद्दिष्टाच्या ८७ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत: खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन घेतल्या जाते. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानंतर जिल्ह्यातील शेतकरीवर्ग यांत्रिक पद्धतीने शेती कसू लागला आहे. त्याचबरोबर उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करू लागला आहे. हे सर्व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा उपलब्ध नसल्याने कर्ज काढल्याशिवाय पर्याय उरत नाही. यापूर्वी सावकाराकडून शेतकरी कर्ज घेत होता. मात्र सावकार अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारून शेतकऱ्यांची फसवणूक करीत होता. त्यामुळे शेतकरीवर्ग लुबाडला जात होता. यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात ६ राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत. सर्व राष्ट्रीयकृत बँकांना खरीप हंगामात ५२ कोटी ७३ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी या बँकांनी ३५ कोटी ४२ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ६७ टक्के एवढे आहे. ग्रामीण बँकांना दिलेल्या १२ कोटी ६५ लाख रूपये कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी त्यांनी १२ कोटी ९४ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण १०२ टक्के आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांना ४४ कोटी ४२ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४९ कोटी ११ लाख रूपये एवढे कर्ज वाटप या बँकेने केले आहे. म्हणजेच कर्ज वाटपाचे प्रमाण उद्दिष्टाच्या १११ टक्के एवढे आहे. शेतकरीवर्ग कर्ज बुडवितो, अशी चुकीची समजूत राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची झाली असल्याने या बँका शेतकऱ्याला बँकेच्या दारात उभे राहू देत नव्हत्या. मात्र ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेला शेतकऱ्याला कर्ज वाटप करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका आता काही प्रमाणात कर्जाचे वाटप करीत आहेत. तरीही त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा पाहिजे त्याप्रमाणात ओढा असल्याचे दिसून येत नाही. राष्ट्रीयकृत बँकांपैकी बँक आॅफ इंडियाने ११ कोटी ५३ लाख, बँक आॅफ महाराष्ट्रने १२ कोटी २७ लाख, कॅनरा बँकेने २० लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ५१ लाख, आयडीबीआय बँकेने ६४ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियाने ९ कोटी ८० लाख, युनियन बँक आॅफ इंडियाने ४६ लाख, असे एकूण ३५ कोटी ४२ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपाचे प्रमाण ६७ टक्के आहे. ग्रामीण बँक व सहकारी बँकांशी तुलना करता राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)